अकोला दिव्य न्यूज : विदर्भाच्या सहकारी क्षेत्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा असलेल्या अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची धुरा तिसऱ्या पिढीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. प्रदिर्घ काळ अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत बॅंकेला भक्कमपणे उभे करणारे डॉ. वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांचे नातू आणि डॉ. संतोष कोरपे यांचे पुत्र डॉ.जयराज संतोषकुमार कोरपे यांच्या हाती आज बॅंकेची सुत्रे देण्यात आली. यासोबतच उपाध्यक्षपदी माजी मंत्री सुभाष ठाकरे यांचे पुत्र रामेश्वर ठाकरे यांची निवड करून ठाकरे कुटुंबातील दुसऱ्या पिढीने पदार्पण केले.

अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे निवडणूकी करीता अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचीत संचालकांची सभा आज गुरुवार दि.९ एप्रिल २०२६ रोजी अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिव्हील लाईन स्थित सभागृहात ठेवण्यात आली होती. निवडणुकीचे अध्यासी अधिकारी गितेशचंद्र साबळे यांनी जाहिर झालेल्या कार्यक्रमानुसार अध्यक्षपदाकरीता डॉ.जयराज संतोषकुमार कोरपे तर उपाध्यक्ष पदाकरीता रामेश्वर सुभाषराव ठाकरे यांचेच अर्ज सादर झाल्याने अध्यासी अधिकारी साबळे यांनी निवडणुक कार्यक्रमास अनुसरून अध्यक्षपदी डॉ.जयराज कोरपे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे निवड प्रक्रिया सभेत बँकेचे संचालक डॉ. संतोषकुमार कोरपे, गोपाल काकड, अजिंक्य राऊत, कल्पना पाचपोर, अरविंद इंगोले, रामेश्वर वाघ, अनिलकुमार जाधव, जावेद उल्लाह खान पटेल, डॉ. धिरज देशमुख, उषाताई हिंगणकर, संदीप खारोडे, अभिषेक तिडके, धनंजय गोरे, शोभाताई सुभाषराव झनक, नितीन दिलीप जाधव, विश्वनाथ ताथोड, ललीत सुधाकरराव बहाळे, गिताबाई महादेव ठाकरे, अपर्णा शिरीषराव धोत्रे उपस्थित होते. बिनविरोध निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य उपस्थित होते.

जिल्हा बँकेची धुरा तिसऱ्या पिढीकडे देताना, धोत्रे,तिडके, झनक, हिदायत पटेल, हिंगणकर, राऊत आणि ताथोड कुटुंबीयांचे स्थान कायम राखले गेले आहे.
