Thursday, April 9, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला ; 'त्या' महिलेचा खून पतीनेच केला ! ओळख पटली

अकोला ; ‘त्या’ महिलेचा खून पतीनेच केला ! ओळख पटली

अकोला दिव्य न्यूज : अकोला-खामगाव मार्गा लगतच्या अन्नपूर्णा मंदिराजवळील अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून महिलेच्या पतीनेच तिचा काटा काढल्याचे तपासात समोर येत आहे. अन्नपूर्णा मंदिराजवळच्या झुडपात ७ एप्रिल २०२६ रोजी ३० वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. महिलेची हत्याकरून तिचा चेहरा विद्रुप करून ओळख लपविण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. तपासासाठी आव्हान ठरणाऱ्या या घटनेचा छडा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस लावत असताना आरोपी थेट पोलिसांना शरण आला आणि पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.

एक इसम लघवीसाठी आला असता, त्याला एका महिलेचा मृतदेह आढळला आणि त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली.घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने तपासात अनेक व्यत्यय येत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरातील एका गॅरेज मधून सीसीटीव्ही फुटेज गोळा केले होते.मोटारसायकलवरून पोतडी घेवून जाणाऱ्या इसमावर पोलिसांचा संशय वाढलेला होता. दरम्यान गुन्हे शाखेने याप्रकरणी महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले.

दरम्यान बार्शीटाकळी येथे राहणारा शाह याने पोलिस ठाण्यात येवून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. डाबकीरोड पोलिसांनी शाह विरूध्द खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. आरोपीने थेट गुन्ह्याची कबुली दिली. जर आरोपी पोलिसांना शरण आला नसता तर गुन्हे शाखेचे पथक त्याच्यापर्यंत पोहोचणार होते. यासाठी त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आलेले होते.

महिला नऊ दिवसांची ओली बाळांतीण : ज्या महिलेची हत्या झाली त्या महिलेने बार्शीटाकळीच्या शाह नामक इसमासोबत प्रेम विवाह केला होता. त्याची ही दुसरी पत्नी होती. दरम्यान अपत्य झाल्याने वाद होऊन ही हत्या झाली असल्याचे बोलले जाते. हत्या झाली तेंव्हा ही महिला नऊ दिवसांची ओली बाळांतीण असल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे आता अपत्य कुठे आहे? याचा तपास सुरू झाला आहे. आंतरधर्मीन लग्न केलेल्या या महिलेच्या नशीबी असे आयुष्य असेल असं कधी तिने विचारही केला नसेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!