अकोला दिव्य न्यूज : बिर्ला कॉलनी येथील सन्मित्र पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवत चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इंटरमिजिएट व एलिमेंट्री परीक्षेचा निकाल जाहीर होताच संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सत्र 2024-25 मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ए, बी व सी ग्रेडमध्ये यश मिळवले. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळवत शाळेचा गौरव वाढवला.

एलिमेंट्री परीक्षेत श्रेयस भटकर, कनवी पटेल, तन्वी ठोंबरे, स्वरा महल्ले व समीक्षा सोळंके यांनी ए ग्रेड मिळवत आपल्या कलागुणांची झलक दाखवली. तसेच बी ग्रेडमध्ये अंजली चराटे, दर्शना बेलसरे, प्राविण्या शेगोकार, इशिका कडोळे, ईशांत राऊत, वेदांत गणेश, लावण्या दवंडे व गणराज आसरे यांनी यश संपादन केले. संकेत पवार, ऋषिकेश वानखडे, हर्ष इंगोले व समर्थ धरमठोक यांनी सी ग्रेड प्राप्त करत उल्लेखनीय कामगिरी केली.
इंटरमिजिएट परीक्षेत धनश्री देशमुख व दर्शन घरडे यांनी ए ग्रेड मिळवत विशेष यश मिळवले. तर कृतिका गावंडे, आस्था अटकर, रिद्धी पवार व दक्ष वडाळ यांनी बी ग्रेडमध्ये चमकदार कामगिरी केली. नील पांडे व ऋषभ मिश्रा यांनी सी ग्रेड प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या उल्लेखनीय यशामागे कलाशिक्षक चीलात्रे यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या परिश्रमाचेही सर्वत्र कौतुक होत आहे. सन्मित्र पब्लिक स्कूलच्या या यशामुळे शाळेच्या गुणवत्तेचा लौकिक अधिक उंचावला असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
