अकोला दिव्य न्यूज : शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना मुल्यवर्धित शिक्षण देण्यासाठी आपलं आगळेपण जोपासणारे हॅपी अवर्स शाळेचे विद्यार्थी आणि व्यवस्थापनाच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत गेला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेवर भर देण्यासोबतच विविध क्रीडा व सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत, शाळेने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना भरीव यश मिळत आहे.

कराटे या क्रीडा प्रकारात सुभाष इंगळे या विद्यार्थ्याने यशाची फटकेबाजी करत शाळेचं नाव लौकिक केले. एन.के.एफ.आय.एस ५ व्या ऑल इंडियन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत आदेश सुभाष इंगळे या विद्यार्थ्याने सलग दोन वर्षे (2024-25 आणि 2025- 26) मध्ये रौप्य पदक प्राप्त केले.यासोबतच स्ट्रॉग शोटोकन राष्ट्रीय कराटे अजिंक्यपद (2019) स्पर्धेत सुवर्णपदक, नागपुरातील निर्भया ओपन कराटे स्पर्धेत सुवर्णपदक, राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक, महाराष्ट्र राज्य खुल्या कराटे स्पर्धेत कांस्यपदक तसेच सहाव्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धत ट्रॉफी पटकावली. राज्य क्रीडा दिवस निमित्ताने क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सुभाष इंगळे याला सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेत त्याचा सत्कार करण्यात आला.

हॅपी अवर्स स्कूलचा बुध्दिबळ विजेते मास्टर अंशुल विशाल तायडे यांचा शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्याला वर्ष 2026 चा ग्रॅड मास्टर म्हणून गौरवले असून अकोला महानगर जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या वतीने पारस येथे एक दिवसीय ओपन रॅपिड बुध्दिबळ स्पर्धात त्याने द्वितीय क्रमाकाच पारितोषिक पटकावले. यासोबतच अंडर 13 एक दिवसीय रॅपिड बुध्दिबळ स्पर्धेत चौथा क्रमांक प्राप्त केला.

मास्टर अंशुल विशाल तायडेने स्व. रामराव गोरले व कमलाबाई गोरले ओपन रॅपिड चेस स्पर्धा 2026 व पॉवर चेस अकादमी संघटनेच्या वतीने आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त. तसेच बुलढाणा जिल्हा बुध्दिबळ मंडळाच्या वतीने व्ही.आर. बुध्दिबळ अकादमी एकदिवसीय खुली रॅपिड बुध्दिबळ स्पर्धा 2026 मध्ये बुलडाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. चेस असोसिएशन ऑफ वाशिमतर्फे रामा इंटरनॅशनल स्कुल ओपन रॅपिड बुध्दिबळ स्पर्धा 2026 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.

हॅपी अवर्स स्कुलची इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी आनंदी निलेश ठोकळ हिने 2023 मध्ये जिनीयस प्रोअॅक्टिव्ह अंबॅकस स्पर्धेत कांस्यपदक तर 2023-24 मध्ये आयोजित गणित ऑलिंपियाड फाउंडेशनमध्ये सुवर्णपदक आणि 2025 मध्ये जिनियस अबॅकस उन्हाळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. शाळा व्यवस्थापनाने या यशाबद्दल तीचा सत्कार केला.

इयत्ता ७ वीचा विद्यार्थी शर्व विश्वेश भागवतकर हा 2023 च्या प्रादेशिक स्पर्धेत SIP Abacus Prodigy मध्ये दुसरा उपविजेता तर 2023 च्या गणित आणि विज्ञान ऑलिंपीयाडमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि 2024 मध्ये अखिल भारतीय गांधर्व मंडळ, मुंबई तर्फे घेतल्या गेलेल्या तबला विषयाच्या पहिल्या परिक्षेत प्रथम क्रमांक तसेच 2025 मध्ये दुसऱ्या परिक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. शाळा व्यवस्थापनाने या यशाबद्दल तीचा सत्कार केला.

