Thursday, March 26, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील 'नंद'चा गणेश भक्तीचा 'अनमोल ठेवा' पुस्तक स्वरूपात ! ऐतिहासिक प्रकाशन सोहळा

अकोल्यातील ‘नंद’चा गणेश भक्तीचा ‘अनमोल ठेवा’ पुस्तक स्वरूपात ! ऐतिहासिक प्रकाशन सोहळा

अकोला दिव्य न्यूज : एखाद्या व्यक्तीचा छंद जेव्हा संग्रहालयाचे रूप घेतो, तेव्हा तो केवळ संग्रह उरत नाही तर ऐतिहासिक ठेवा ठरतो. प्रदीप नंद यांच्या एका विलक्षण स्वप्नपूर्तीवर आधारित ‘प्रदीप नंद उर्फ गोट्याचा गणपती संग्रह आणि सातबारा’ या डॉ.माधव देशमुख लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज श्रीराम नवमीच्या पर्वावर वाशिंबा येथील ‘नंद उद्यान’ येथे दिमाखात संपन्न झाला.

सोहळ्याला माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया व विप्लव बाजोरिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर शुगर कारखाना हिंगोली व सुभाष शुगर नांदेड चे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख होते. ग्रंथाचे विमोचन प्रसिद्ध विद्यावाचस्पती स्वानंद पुंड (वणी) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणपती संग्रहालयाचे प्रेरक प्रदीप नंद, लेखक डॉ. माधव देशमुख व चिखलदऱ्याचे नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर यांची विशेष उपस्थिती होती.

या सोहळ्याला नागपूर गार्डन क्लबच्या अध्यक्षा अनुजा परचुरे, जयंत पडगीलवार, प्रियंका पडगीलवार, जयंत मराठे, उदय मलासे, मोहन गंद्रे, श्रीकांत पागरूत, शेखर ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली. यासोबतच श्री व सौ.संजय राठोड, श्रीराम देशमुख, अपर्णा देशमुख, विहाना देशमुख, अंकिता देशमुख, राज देशमुख, मकरंद जोशी, ओवी जोशी, प्रदीप पांडे, अरुणा पांडे, अनुराधा काळे, मेघा नंद, ज्योती नंद, राज जोशी, दीप्ती जोशी, संजय शहा, माधव निलाखे, किशोर मांगटे पाटील, डॉ. किशोर देशपांडे, अनिरुद्ध खरे, महेश मोदक, मोहिनी मोडक, सुभाष गोरे, अँड. सुभाष मुंगी, पठाण, संग्राम राजूरकर, धनंजय तायडे, आनंद धूत, रवी रामीधमी यासह वाशिंबा येथील सांप्रदायिक भजन मंडळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्ती आणि साहित्याचा संगम: कार्यक्रमाची सुरुवात ‘ग्रंथदिंडीने’ करण्यात आली. लेखक डॉ. देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून या ‘स्वप्नपूर्ती’ प्रवासावर प्रकाश टाकला. पाहुण्यांचा परिचय इंद्राणी देशमुख आणि शारदा जोशी यांनी करून दिला.ज्येष्ठ साहित्यिक दिलीप देशपांडे यांनी ग्रंथाचे सखोल विश्लेषण केले, तर प्रमुख पाहुणे स्वानंद पुंड यांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रवचनातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन नंदकिशोर डंबाळे तर आभार प्रदर्शन दिपाली नंद यांनी मानले.
यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम:
या आयोजनासाठी अविनाश पाटील, विजय मोहरीर, संजय आगाशे, सुधाकर देशमुख, श्रीकांत देशपांडे, राज पाटील, धनंजय तायडे, प्रकाशक इंद्राणी देशमुख, मिलिंद सभापतीकर, सतीश पिंपळे, मधुकर बोदडे आणि प्रदीप नंद मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!