Monday, March 23, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्याचे सुवर्णकार शैलेश खरोटे बिनविरोध अकोला सराफा असोसिएशनच्या शहराध्यक्षपदी

अकोल्याचे सुवर्णकार शैलेश खरोटे बिनविरोध अकोला सराफा असोसिएशनच्या शहराध्यक्षपदी

अकोला दिव्य न्यूज : मागील पाच वर्षांत केलेल्या कार्याचा विचार करून अकोला सराफा असोसिएशनच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध एस.एस.खरोटे सुवर्णकारचे संचालक शैलेश खरोटे यांची निवड करून शहराध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा सोपविण्यात आली. यावेळी सर्व वरिष्ठ पदाधिकारी व सराफा व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अकोला दिव्य छायाचित्र

उत्कृष्ट नियोजनशैली व सर्वच व्यापाऱ्यांसाठी कामासाठी तत्परतेने उपलब्ध राहण्याच्या स्वभावामुळे त्यांना सर्वांचा विश्वास प्राप्त झाला आहे. व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या आधारेच त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. निवड प्रक्रिया झाल्यानंतर उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी खरोटे यांना शुभेच्छा दिल्या.

या बैठकीत सराफा क्षेत्रातील गोपालबाबू खंडेलवाल सुनील जांगिड, राजकुमार वर्मा, संतोष खंडेलवाल,नितीन खंडेलवाल, प्रकाश सराफ, नंदू अलीमचंदानी, राहुल भगत, विजय खरोटे, विनोद माथने, अश्विन दंडगव्हाळ, सचिन भामरे, मोहन वाकोडे,विशाल चौधरी, राजेंद्र आडगावकर, सुनील वर्मा, संजय वर्मा, किरण पिंगळकर, स्वप्निल मोरे, सागर वाखारकर, अनिल वाखारकर, संजय शाह, निहार अग्रवाल, हिरेन वखारिया, मनीष हिवराळे, मधुर खंडेलवाल, अमित शाह, नारायण अडगावकर, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाचकवडे, अमोल पाचकवडे, सुनील बुडकले, सुनील अडगावकर, विजय भामरे, विजय सोनी, प्रफुल्ल सोनी, अशोक भंडारी, सिद्धेश कागलीवाल, देवेंद्र दोडके यासह इतर मान्यवर सराफा व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!