Sunday, March 22, 2026
No menu items!
No menu items!
Homeअपघात की...!अकोल्याच्या सर्वज्ञ निंबाळकरचा मृतदेहच मिळाला

अपघात की…!अकोल्याच्या सर्वज्ञ निंबाळकरचा मृतदेहच मिळाला

अकोला दिव्य न्यूज : मागील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ११ वर्षीय मुलाचा मृतदेह अकोला शहरालगतच्या कृषी विद्यापीठ परिसरातील मॉर्निंग वॉक भागात असलेल्या एका पाणी साचलेल्या डबक्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून प्रथमदर्शनी हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हा अपघात की घातपात या बाबीचा उलगडा होईल.

अकोला औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रहिवासी वसाहतीत राहणाऱ्या निंबाळकर कुटुंबातील ११ वर्षीय सर्वज्ञ निंबाळकर १९ मार्चला घरातून बाहेर गेला आणि परत आला नाही. सर्वत्र शोध घेतला असता तो मिळाला नाही किंवा काहीही माहिती मिळाली नाही. तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सर्वज्ञ निंबाळकरला पोहण्याचा मोह असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी यादृष्टीने परिसरात असलेल्या एका विहिरीत शोध घेतला मात्र काही आढळून आले नाही.

गत ३ दिवसांपासून शोधाशोध सुरू असताना, आज सकाळी कृषी विद्यापीठ परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांपैकी काहींना कुजकट दुर्गंधी येत होती. कुजकट दुर्गंधी कुठून येतं आहे, याचा काहींनी मागोवा घेतला. तेव्हा जवळच्या डबक्यातून हा दुर्गंध येत असून डबक्यात काही तरी पडून असल्याचे दिसून आले. तातडीने पोलिसांना माहिती दिली.
ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि शोध घेतला असता, दुर्दैवाने सर्वज्ञ निंबाळकरचा मृतदेह आढळून आला. निंबाळकर राहत असलेल्या परिसरात विचारपुस व चौकशी केली असता, सर्वज्ञचे कोणाही सोबत भांडण तंटा नव्हते आणि त्याला पोहण्याचा मोह असल्याने तो या ठिकाणी आल्यावर त्याला पोहण्याचा सरावासाठी डबक्यात उतरला असता, बुडून गेला. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!