Thursday, March 19, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील डॉ मुकेश राठी यांनी केलेली शस्त्रक्रिया 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये

अकोल्यातील डॉ मुकेश राठी यांनी केलेली शस्त्रक्रिया ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये

अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील ख्यातनाम जेष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. मुकेश रमेश राठी यांनी एका महिला रूग्णावर यशस्वीपणे केलेल्या शस्त्रक्रियेसाठी त्यांचा नावाची जागतिक पातळीवरील ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे महिला रुग्णांच्या गर्भाशयात अवघड झालेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करून भविष्यातील गर्भधारणेसाठी गर्भाशय सुरक्षित ठेवण्यात आले आहे.शहरातील वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. राठी यांनी केलेली कामगिरी अत्यंत सन्मानजनक आणि नावलौकिक प्राप्त करून देणारी आहे.

अकोला येथील लक्ष्मीनारायण मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक व बीन टाक्याची शस्त्रक्रियेसाठी सुपरिचित डॉ. मुकेश राठी यांच्याकडे एक महिला रुग्ण होतं असलेल्या त्रासाबद्दल उपचारासाठी आली होती. या रूग्णाची तपासणी केली असता गर्भाशयात ३४.८ सेमी x २९.५ सेमी x २० सेमी इतका आकार आणि १६.७५ किलोग्रॅम वजन असलेली गाठ दिसून आली.

आतापर्यंतची ही सर्वात मोठी गाठ (फायब्रॉइड) गाठ दिसून आली आणि महिलेचे वय अवघं ३२ वर्ष असल्याने रुग्णांच्या भविष्यातील गर्भधारणासाठी गर्भाशय सुरक्षित ठेवणं गरजेचं होतं. अवघड व अतिरिक्त जोखीम लक्षात घेऊन गर्भाशयातील ३४.८ सेमी x २९.५ सेमी x २० सेमी इतका आकार आणि १६.७५ किलोग्रॅम वजन असलेली सर्वात मोठी गाठ (फायब्रॉइड) शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकली.

ही शस्त्रक्रिया जवळपास ९० मिनिटे चालली. सर्वात महत्वाचे म्हणजे शस्त्रक्रिया करताना रुग्णाचे भविष्यातील गर्भधारणेसाठी गर्भाशय सुरक्षित ठेवण्यात डॉक्टर राठी यशस्वी ठरले. गर्भाशयातील (फायब्रॉइड) गाठीवर शस्त्रक्रिया संबंधित कार्यात डॉ राठी यांनी यशस्वीपणे केलेली शस्त्रक्रिया ही सर्वाधिक अवघड श्रेणीत येते. त्यामुळे ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ चे व्यवस्थापक संपादक अनिर्बान सरकार यांच्या हस्ताक्षरात प्रमाणपत्र देण्यात आले. अकोला शहर व जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी ही नोंद अत्यंत सन्मानजनक आणि नावलौकिक प्राप्त करून देणारी आहे.अकोला दिव्य परिवाराशी जुळलेले डॉ. राठी आणि कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!