Tuesday, March 17, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला येथील प्रभात प्रि-प्रायमरीचा प्रेरणादायी ‘ग्रॅज्युएशन सेरिमनी’

अकोला येथील प्रभात प्रि-प्रायमरीचा प्रेरणादायी ‘ग्रॅज्युएशन सेरिमनी’

अकोला दिव्य न्यूज : अत्यंंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरण, पालकांनी भरगच्च भरलेले सभागृह, कार्यक्रमासाठी समर्पक सजलेले व्यासपीठ व मान्यवरांच्या उपस्थितीने प्रभात प्रि-प्रायमरी मधील सिनिअर के.जी. पूर्ण केलेल्या चिमुकल्यांना प्रेरणादायी ठरावा असा दिमाखदार ‘ग्रॅज्युएशन सेरिमनी’ प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक ॲड.आशिष पवित्रकार व होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ.कल्याणी आशिष पवित्रकार उपस्थित होते.

प्रभात प्रि-प्रायमरीच्या ‘ग्रॅज्युएशन सेरिमनी’च्या बहारदार सोहळ्यात प्रभात किड्स स्कूलचे संस्थापक संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक ढेरे, सचिव नीरज आवंडेकर, शिल्पा आवंडेकर,प्रभात प्रि-प्रायमरीच्या प्राचार्या वैशाली टोलमारे, प्रभात किड्स स्कूल (वरिष्ठ) प्राचार्या वृषाली वाघमारे, उपप्राचार्या अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, सिनिअर को-ऑर्डीनेटर मो.आसिफ, सीबीएसईचे को-ऑर्डीनेटर प्रशांत होळकर, प्रा. डॉ .सुहास उगले, प्रभात संचालक मंडळाच्या सदस्य व्हि.अनुराधा उपस्थित होत्या.
समारंभाप्रारंभी पदवी सोहळ्याची विशिष्ट व आकर्षक वेशभूषा असलेल्या चिमुकल्यांची सभागृहाकडे शिस्तबद्ध मिरवणूक निघाली व ते सभागृहात स्थानापन्न झाल्यावर शिक्षणाबाबत प्रेरणादायी शपथ त्यांनी देण्यात आली. प्रभात प्रि-प्रायमरी ‘ग्रॅज्युएशन सेरिमनी’ समारंभाचे प्रास्तविक व भूमिका कथन जान्हवी गेही यांनी केले. आपल्या शैक्षणिक पर्वातील पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य व आनंद उपस्थितांना भावपूर्ण करणारा होता.
या समारंभादरम्यान ज्युनिअर के.जी.च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण व विविधांगी नृत्यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची प्रचंड टाळ्यांनी दाद मिळविली.
पदवी प्रमाणपत्र प्राप्त केले त्याबद्दल प्रातिनिधिक म्हणून क्रिशिव मनवर, विराज बालानी, सावी मेटांगे, अधिरा बोबडे, अद्विक ताठे यांनी ‘प्रभात’ प्री -प्रायमरी स्कूल मध्ये प्राप्त केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक बाबींचा उल्लेख केला व प्रभात प्रि-प्रायमरी स्कूल ही बालवयातील मुलांसाठी ‘केअरिंग’आणि ‘इन्स्पायरिंग’ असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

या समारंभा प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून डॉ.सौ. शिरीन देशमुख, सौ. चार्मी शहा व श्री अनुप टापरे यांनी आपल्या भाषणात पाल्यांना प्राप्त शिक्षण, विकसित केलेल्या चांगल्या सवयी व शिष्टाचार याचा आवर्जून उल्लेख केला आणि प्रभात मध्ये हसत-खेळत शिक्षण पध्दती, नावीन्यपूर्ण उपक्रमाव्दारे विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणारा आत्मविश्वास व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक बाबींविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्रशिक्षित व निष्णात शिक्षक वर्ग याबाबत समाधान व्यक्त केले.
‘ग्रॅज्युएशन सेरिमनी’ सोहळ्याचे नियोजनबध्द संचालन गजानन बाठे व पुनम गोरे यांच्या मार्गदर्शनात ख्याती सयानी ,त्रिशा राठोड, पाखी शहा व स्वर्णिमा घुले यांनी तर आभार प्रदर्शन मेघा अहिर यांनी केले.
‘प्रभात’ मधील त्रिशा राठोड आणि पाखी शहा ह्या विद्यार्थिनींनी उपस्थित पालक व मुलांसाठी आयोजित केलेल्या मनोरंजक खेळांनी या समारंभात उत्साह व चैतन्य निर्माण केले. ‘मनोरंजक खेळांतून शिक्षणा’ ची झलक उपस्थितांना आनंद देऊन गेली.
‘गॅ्ज्युएशन सेरेमनी’ च्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या नेतृत्वात नृत्य दिग्दर्शक कु. स्वप्नाली बंड व मुक्ती कर्हेकर तसेच प्रि-प्रायमरीतील शिक्षक वृंदांमध्ये वैष्णवी इंगळे, प्राजक्ता ताथूरकर (सिनिअर के.जी.- यलो), शितल बायस्कर व आकांक्षा वासकर (सीनियर के.जी.- ग्रीन)आणि जान्हवी गेही व सरोज गुडिया (सिनिअर के.जी. इंडिगो), अपेक्षा तायडे व पूजा मोरे (सिनिअर के.जी. ब्ल्यू), ; अंबिका मिरजामले व भाग्यश्री जामोदकर (सिनिअर के.जी.- व्हायलेट); ग्राफीक विभाग, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट विभागाचे प्रदीप विखे, संगीत विभाग, तांत्रिक विभाग व प्रभात परिवारातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रभात प्रि-प्रायमरी स्कूलचा ‘ग्रज्युएशन सेरिमनी’ हा केवळ सोहळा नव्हे तर सकारात्मक स्वप्नांची दिशा, आत्मविश्वासाचा मूलमंत्र आणि नव्या युगातील नव्या पंखांनी भावी यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी मिळालेले सशक्त बळ ठरणारा समारंभ सदैव स्मरणात राहणार आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित पालक वृंदांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!