Tuesday, March 17, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला माहेश्वरी समाजाने नवीन शाळेसाठी पुढाकार घ्यावा.आपण सर्वोत्तोपरी मदत करु - नगरसेवक...

अकोला माहेश्वरी समाजाने नवीन शाळेसाठी पुढाकार घ्यावा.आपण सर्वोत्तोपरी मदत करु – नगरसेवक इन्नाणी

अकोला दिव्य न्यूज : माहेश्वरी समाजातील विद्यार्थ्यांसाठी एका नवीन शाळेचा प्रकल्प माहेश्वरी समाजाने हाती घ्यावा. प्रकल्पासाठी जमीन संपादनापासून ते आवश्यक एवढे संपूर्ण बांधकाम होईपर्यंत सगळी मदत व भरीव आर्थिक योगदान देण्यापर्यंत या प्रकल्पाची जबाबदारी आपली आहे. हा आपला दृढ संकल्प आहे.असे ठोस अभिवचन अकोला महानगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक सुनील इन्नाणी यांनी माहेश्वरी समाज ट्रस्टच्या प्रतिनिधींना दिले. अकोला नवनियुक्त सदस्य इन्नाणी यांच्या निवासस्थानी जाऊन माहेश्वरी समाज ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत व सत्कार केला.

माहेश्वरी समाजातील अशा गतिमान व्यक्तिमत्त्वाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. इन्नाणी यांनी समाजासाठी केलेला संकल्प व समर्पणची भावना आपल्या समाजाच्या भवितव्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल आणि त्यांचा नेतृत्वाखाली समाज व शहर विकासाला नवी गती मिळेल.याची आम्हा सर्वांना खात्री आहे. असे मतं सत्कारकर्त्यांनी व्यक्त केले

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विजय तोष्णीवाल, प्रधानमंत्री विजय राठी, उपाध्यक्ष शांतीलाल भाला, कोषाध्यक्ष देवानंद लढ्ढा, सहसचिव विनीत बियाणी, कार्यकारिणी सदस्य पंकज मणियार, राजेश भंसाली, गिरीश तोष्णीवाल, आर्किटेक्ट पवन बंग उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!