Saturday, March 14, 2026
No menu items!
No menu items!
Homeबृजलता शिवरतन जाजू यांच निधन ! आज दुपारी अंत्यसंस्कार

बृजलता शिवरतन जाजू यांच निधन ! आज दुपारी अंत्यसंस्कार

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण क्षेत्रात अनेक क्रांतिकारी बदल करण्यासोबतच अकोला शहर आणि जिल्ह्यात सहकारी गृहनिर्माण व गृहतारण संस्थांचे मजबूत जाळे तयार करणारे स्व शिवरतन जाजू यांच्या या कार्यात खंबीरपणे भक्कम साथ देणा-या त्यांच्या पत्नी बृजलता शिवरतन जाजू यांचे आज शनिवार १४ मार्च रोजी सकाळी वयोमानानुसार निधन झाले. त्यांच्या मागे सून आरती जाजू, तीन मुली, जावई, दोन नात, नातं जवाई आणि मोठे आप्तपरिवार आहे.

वडील शिवरतन जाजू यांच्या पावलावर पाऊल ठेवत सहकारी गृहनिर्माण क्षेत्रासोबत माहेश्वरी समाजात सक्रिय योगदान देणारे आणि माहेश्वरी प्रगती मंडळ ते अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटना आणि महासभा पर्यंत विविध पदांवर कार्यरत राहिलेले स्व शशिकांत जाजू यांच्या त्या आई होत्या. माहेश्वरी महिला मंडळाच्या आधारवड असलेल्या राजकुंवर लढ्ढा यांच्या त्या मोठ्या वहिणी तसेच शहरात मामाजी म्हणून ओळखले जाणारे राधेश्याम बंग हे बृजलता जाजू यांचे ननंद जावई आहेत.

अत्यंत लाघवी स्वभाव व सर्वांना प्रेमळपणाची वागणूक देणाऱ्या बृजलता जाजू तेवढ्याच धार्मिक वृत्तीच्या होत्या.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी तेवढ्याच आपुलकीने सर्व नातीगोती जोपासली. कुटुंबाची परिस्थिती अनुकूल होऊन देखील त्यांच्यात तसुभरही बदल झाला नाही.

त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार १४ मार्च रोजी दुपारी ५.३० वाजता, गोरक्षण रोडवरील निवासस्थान यमुना आरर्केड, क्रोमा शोरूमच्यावर गोरक्षण रोड येथून जठारपेठ येथील अमृत निवास येथे जाऊन, तद्नंतर उमरी येथील मोक्षधाम जाईल. याठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!