Saturday, March 14, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात तीव्र संताप…. तर येत्या २ दिवसात ५० टक्के हॉटेल बंद होणार

अकोल्यात तीव्र संताप…. तर येत्या २ दिवसात ५० टक्के हॉटेल बंद होणार

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र शासनाने व्यावसायिक एलपीजी गॅसच्या वापराचे प्राधान्यक्रम निश्चित केले असून शासनाच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील रुग्णालय, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना गॅस पुरवठ्यासाठी प्राधान्य दिले गेले आहे. या निर्णयामुळे अकोला शहरातील खाद्य व्यावसायिक, हॉटेल व कॅटरिंग व्यावसायिकांच्या बैठकीत शासन निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
एकीकडे तर गॅसचा मुबलक साठा असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे हॉटेल व्यवसायावर गॅस पुरवठ्याचे निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून हॉटेल आणि खाद्य व्यवसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा करावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे. जर या निर्णयावर राज्य सरकारने विचार केला नाही तर येत्या दोन दिवसात शहरातील ५० टक्के हॉटेल व्यवसाय बंद होण्याची साधार भिती व्यक्त करण्यात आली आहे.

अकोला दिव्य छायाचित्र

या संदर्भात सोमवारी अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे हॉटेल, रेस्टॉरंट स्वीट मार्ट कॅटरर्स संचालकांच्या समस्याची माहिती देण्यात येईल. हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल,ओमप्रकाश गोयंका, कृष्णकुमार राठी, भावेश खिलोसिया, श्रीराम पांडे, जसपालसिंग नागरा, प्रशांत देशमुख, बार असोसिएशनचे श्रीकांत देशमुख, विवेक मंत्री, डॉ मनोज अग्रवाल, बोनीभाई शहा, पिंट्टु सेठ गोसावी, संजय सिसोदिया, गुड्डू ठाकूर, दिपक वोरा, भूषण मेहता, ईश्वर जैन, आनंद अग्रवाल, सागर अमानकर, हर्षल भांबेरे, रविभाऊ घाटे, गजानन खंडेलवाल, धनु भाई खिलौसिया, अश्विन खिलौसिया, यश मेहतासह मोठ्या संख्येने हॉटेल रेस्टॉरंट स्वीटमार्ट कॅटरर्स संचालक उपस्थित होते.

सध्या लग्नसराईची लगबग असून अनेक लग्नाच्या ऑर्डर आमच्याकडे आहेत. अशावेळी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यास लग्न असलेल्या घरात व व्यावसायांसमोर मोठे संकट निर्माण होऊन गोंधळ घातला जाईल.तेव्हा शासनाने त्वरित व्यवसायिक सिलेंडर उपलब्ध करून दिलासा द्यावा.संजय सिंग सिसोदिया, केटरर्स व्यावसायिक अकोला

शासनाने काल काढलेल्या परिपत्रकात व्यवसायिक सिलेंडर वितरणात हॉटेल रेस्टॉरंट स्वीट मार्ट कॅटर्स यांना प्राधान्य क्षेत्रातुन वगळण्यात आल्यामुळे खाद्य व्यवसाय संकटात आलेला आहे तरी शासनाने प्राधान्य यादीत हॉटेल रेस्टॉरंट स्वीट मार्ट कॅटर्स यांना काही प्रमाणात का असेना समाविष्ट करून न्याय द्यावा

योगेश अग्रवाल अध्यक्ष ,अकोला हॉटेल असोसिएशन

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!