अकोला दिव्य न्यूज : जागतिक महिला दिनानिमित्त पाटील समाज महिला मंडळाच्या वतीने मराठा सेवा संघाच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांमुळे हा मेळावा अकोल्यातील महिलांसाठी आकर्षणाचा एक केंद्रबिंदू ठरला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. उज्वला मापारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सुरेखा काळे, डॉ. वंदना मोरे, अपर्णा पाटील, डॉ. सीमा तायडे, डॉ. दिपाली काळे, प्रमिला भिसे, प्रतिभा पाथ्रीकर, पाटील समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली बहाकर, सचिव अँड. दिपाली जानोरकर, कार्याध्यक्षा रूपाली नाकट, जिल्हा संघटिका सरिता वाकोडे उपस्थित होत्या.

प्रारंभी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी राजे यांच्या प्रतिमांचे अतिथींच्या हस्ते पूजन करण्यात येऊन दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रियंका पोटे यांनी गणेश वंदना सादर केली. सोयरा अंधारे या बालिकेने जिजाऊंच्या पोवाडया सह स्वागत गीत गायीले.
अँड. दिपाली जानोरकर यांनी प्रास्ताविक करून पाटील समाज महिला मंडळाच्या स्थापने मागील हेतू विशद केला.अध्यक्षा वैशाली बहाकर यांनी आपल्या मनोगतातून मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच जास्तीत जास्त महिलांनी या मंडळात सहभागी होऊन मंडळाचा नावलौकिक वाढवावा असे आव्हान केले.
महिला मंडळाच्या पदाधिकारी अर्चना पाटील, सोनाली मोरे, वर्षा पोरे, संगीता दाळू, स्वाती बारबदे, संगीता ताथोड, संगीता वानखडे, राधा राऊत, रेणुका पात्रीकर, सुमित्रा काकड, वनमाला ठाकरे, जयश्री राऊत यांनी अतिथींचे स्वागत केले.
मेळाव्यात डॉ. सीमा ताडे यांनी महिलांनी आपले आरोग्य कसे जपावे याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. वंदनाताई मोरे यांनी महिलांनी आपल्या नित्य घर कामासोबतच एखादी कला अवगत करण्यासाठी ही प्रयत्न करावा असे आवाहन केले. डॉ. दिपाली काळे, प्रमिला भिसे, नगरसेविका सुरेखा काळे, सरिता वाकोडे, रूपाली नाकट यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करून विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले.
समाजात विविध उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण करीत असल्याबद्दल गौरी पारस्कर, माधुरी अढाऊ, प्रांजल रायपुरे, वैष्णवी गावंडे, वर्षा जायले, वृंदा काटकर, उमा वक्ते, भक्ती भटकर यांचा मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले. मेळाव्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झाल्याबद्दल माधुरी अढाऊ, वर्षा बारड, ममता भडांगे, प्रियंका पोटे, वृंदा कोरपे, संगीता राऊत, अर्चना आढाव, मीनल गोंडचवर यांना अतिथींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलेत. स्त्रियांच्या उपयोगी वस्तूंचे अनेक स्टॉल्स याप्रसंगी लावण्यात आले होते.

सदर मेळाव्यात स्वाती हिंगणकर, वर्षा शिंदे, निशा जायले, सुनिता गावंडे, भाग्यश्री बिहाडे, सुमन महल्ले, संगीता बाहकर, उषा पावडे, कल्याणी भटकर, पूजा जायले, प्रतिभा पाथ्रीकर, रूपाली थोरात, नूतन इंगळे, ज्योती अढाऊ, वैशाली गावंडे, संगीता राऊत, सुमित्रा काकड, ज्योती चिटके, मीनाक्षी मुळे, वर्षा बारड, किरण पाथरकर, ज्योती पाटील, दीपा भाकरे, शितल कावरे, अनुराधा सूरोसे, दीक्षा पाटील, वैशाली कराळे, आशा अंधारे, माधुरी अढाऊ, संध्या दांदळे, सुनिता ताथोड, वंदना ठाकरे, प्रांजल रायपुरे, अनुराधा सुरवसे, सुनिता मानकर, रेखा भांबेरे, सुशीला वाकोडे, सविता घोगरे यांच्यासह इतरही महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन वर्षा शिंदे व सोनाली मोरे तर आभार प्रदर्शन अर्चनाताई पाटील यांनी केले.
