Thursday, March 12, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील सराफा व्यावसायीक केजडीवाल यांना दुकानात घुसून मारहाण

अकोल्यातील सराफा व्यावसायीक केजडीवाल यांना दुकानात घुसून मारहाण

अकोला दिव्य न्यूज : अकोला पोलीसांचा वचक म्हणा की दरारा म्हणा किंवा कायद्याचा बाज संपला? असा गंभीर प्रश्न अलिकडच्या घडलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. अलंकार मार्केटमधील राडाप्रकरण शांत होत नाही तोच, अकोला सराफा बाजारात पार्किंगवरून एका गावगुंडाने राजरोसपणे धुडघूस घातल्याचे सीसीटिव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. सराफा बाजाराचे जिल्हाध्यक्ष राजकुमार वर्मा यांच्या दुकानाजवळ रत्नेश केजडीवाल यांच्या दुकानात घूसून विनाकारण बेदम मारहाण केली गेली आहे.

समाज माध्यमावर व्हायरल फुटेज मधून

या घटनेला आता आठवडा होऊनही घाबरलेल्या व्यावसायीकांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. अलंकार मार्केटचा प्रकार समोर आला आणि काही जागरूक नागरीकांनी या घटनाक्रमाचा सीसीटीव्ही फुटेज बुधवारी समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने एकच खळबळ माजली. ऐवढे गंभीर प्रकरण झाल्याने सराफा बाजारातील व्यावसायीक दहशतीखाली वावरत आहे.

अकोला सराफा बाजारातील दुकानांसमोर अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे, त्यामुळे पार्किंगसाठी जागा नाही. पर्यायाने सर्वांना आपल्या दुचाकी गाड्या दोन्हीकडेला ठेवव्या लागतात. त्यामुळे चिंचोळ्या मार्गातून वाहतूक करावी लागते. ५ मार्च रोजी एका दोन व्यक्ती एका लहान मुलाला गाडीवर बसून जात होता. चिंचोळ्या मार्गात गाडी काढताना थोडा विलंब झाल्याने एका व्यक्तीने गाडीवरून उतरून थेट धूडघूस घातला. पार्किंगमधील गाड्यांना लाथा मारून त्या खाली पाडल्यात. जमीनीवर लोटून त्यांची नासधूस केली. एका दुकानातून हा सर्व प्रकार रत्नेश केजडीवाल पाहात होते. तू क्या देखता रे…. असे म्हणून या गावगुंडाने त्याच्या दुकानात घुसून त्याला काहीही कारण नसताना बेदम मारहाण केली.

समाज माध्यमावर व्हायरल फुटेज मधून

हा सर्व प्रकार सराफा बाजारातील व्यावसायीकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. विशेष म्हणजे ही हाणामारी अकोला सराफा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजू वर्मा यांच्या दुकानासमोर झाली. जेंव्हा अलंकार मार्केटमधील राडा चव्हाट्यावर आला व पोलिसांनी त्याची दखल घेण्यास सुरूवात केली. तेंव्हा कुठे ५ मार्चला घडलेल्या या घटनाक्रमाचे फुटेज व्हायरल केले गेले.

सराफा बाजारात व्यावसाय करावा लागतो म्हणून व्यावसायीक गावगुंडाच्या विरोधात तक्रार करण्यास धजावत नाही. आता सराफा बाजारातील व्यावसीक गावगुंडाच्या दहशतीखाली आहेत. अकोला पोलिसांचा अंकुश कुठेतरी बोथट होत चालला आहे. त्याचे कारण अधिकाऱ्यांनी शोधून आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!