Tuesday, March 10, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात पर्यावरण संवर्धनाचे उपकरण ! 'प्रभात'च्या 'गोलोकार'ने दुचाकीसाठी केले विकसित

अकोल्यात पर्यावरण संवर्धनाचे उपकरण ! ‘प्रभात’च्या ‘गोलोकार’ने दुचाकीसाठी केले विकसित

अकोला दिव्य न्यूज : डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या प्रभात किड्स स्कूलमधील इयत्ता सहावीचा विद्यार्थी अर्णव गोलोकारने दुचाकी वाहनातून होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी एक अभिनव निष्कासित वायू पुनर्चक्रण प्रणाली ( ई.जी.आर) उपकरण विकसित केले आहे. वाहने सिग्नलवर थांबलेली किंवा आयडल मोडमध्ये असताना मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन ऑक्साइडसारखे हानिकारक वायू वातावरणात सोडले जातात. या समस्येचा अभ्यास करून अर्णवने हे वैशिष्ट्यपूर्ण उपकरण तयार केले आहे.

अर्णवने विकसित केलेले हे उपकरण दुचाकी वाहनांमधून होणारे नायट्रोजन ऑक्साइडसारखे घातक वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास मदत करणार आहे. विशेषतः वाहने सिग्नलवर थांबलेली असताना किंवा आयडल स्थितीत असताना निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. यामुळे केवळ ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण कमी होणार नाही, तर वाहनांमधून निर्माण होणारी अतिरिक्त उष्णताही कमी होण्यास मदत होणार आहे.
लहान वयात पर्यावरण संवर्धनाचा विचार करून तयार केलेल्या अर्णवच्या या नावीन्यपूर्ण संशोधनाला प्रभात किड्स स्कूलचे संस्थापक संचालक डॉ.गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, प्राचार्य वृषाली वाघमारे, परीक्षा विभाग प्रमुख व्ही. अनुराधा यांचे कुशल मार्गदर्शन लाभले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!