Tuesday, March 10, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्याचे डॉ.भांबुरकर वयाच्या 91 व्या वर्षात अनंतात विलीन

अकोल्याचे डॉ.भांबुरकर वयाच्या 91 व्या वर्षात अनंतात विलीन


अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील जुन्या काळातील प्रख्यात धन्वंतरी डॉ.रामेश्वर नारायणराव भांबुरकर यांचे आज मंगळवार १० मार्च रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 91 वर्षाचे होते सायंकाळीच उमरी परिसरातील स्मशानभूमीत त्यांचे वर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव डॉ. अनिरुद्ध भांबुरकर यांनी त्यांना चिताग्नी दिला. यावेळी बहुसंख्य डॉक्टर्स व इतरही गणमान्य नागरिक मोठ्या संख्येत याप्रसंगी उपस्थित होते.


अमरावती जिल्ह्यातील विहिगाव येथील मूळचे रहिवासी असलेल्या डॉ.आर.एन.भांबुरकर यांनी बीएससी करून एमबीबीएसची पदवी संपादन केल्यानंतर 1960 सालापासून अकोला येथे वैद्यकीय सेवा सुरू केली. जनरल प्रॅक्टिशनर म्हणून सेवा देणारे डॉ.भांबुरकर यांनी जिल्ह्यातील हजारो टीबी पेशंट वर उपचार करून त्यांना नवजीवन दिले.

प्रारंभी अकोल्यातील मानेक टॉकीज समोर क्लिनिक सुरू करून आपल्या सेवेचा प्रारंभ केलेल्या डॉक्टरांनी 1985 साली तापडिया नगर परिसरात स्वतःचा दवाखाना उभारला. जिल्ह्यातील ज्येष्ठ डॉक्टरांच्या फळीतील गणले जाणारे डॉ. भांबुरकर याही वयात आय एम ए संघटनेचे सक्रिय सदस्य होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!