अकोला दिव्य न्यूज : जागतीक महिला दिनानिमित्त समाजात विशेष वा उल्लेखनीय, सामाजीक/धार्मिक क्षेत्रात किंवा गरीब व होतकरु कष्टकरी महिलांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून माँ गायत्री ज्येष्ठ नागरीक संघाकडुन जागतीक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माँ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व अकोला मनपा माजी शिक्षण सभापती कमलाताई बलोदे आणि मनपा स्थायी समिती सदस्य व प्रमुख अतिथी योगीताताई गणेश पावसाळे, माजी नगरसेवक मंगलाताई गजानन सोनोने,उज्वलाताई धनंजय धबाले, दिपालीताई आनंद बलोदे, उषाताई ठाकरे व आशाताई मांगुळकर यांच्या हस्ते विशेष वा उल्लेखनीय, सामाजीक/धार्मिक, गरीब व होतकरु कष्टकरी महिला सिंदुताई पदमावार, बबीताताई सर्जेकर, चित्रा ठाकरे उज्वला परनाटे व ईशा पाटील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमला उपाध्यक्ष रामदयाल इंगळे, सचिव अशोक मांगुळकर, शामराव ठाकरे, नितीन ठाकरे, राजाराम उपाध्याय उपस्थित होते.
