Sunday, March 8, 2026
No menu items!
No menu items!
Homeसॅल्युट ! अकोल्याची 'मनिषा' अनुकरणीय व प्रेरणादायी

सॅल्युट ! अकोल्याची ‘मनिषा’ अनुकरणीय व प्रेरणादायी

अकोला दिव्य न्यूज : एकेकाळी योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे अडचणीत आलेल्या सासऱ्यांच्या उद्योगाला नवसंजीवनी देण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या मनीषा आदित्य बजाज आजच्या उच्च विद्या विभुषीत मात्र बक्कळ कमाईची नोकरी करणाऱ्या तरुणाईला दिशा बदलण्याचा विचार करण्यास भाग पाडेल ! त्यांच्या कर्तृत्वाला खरोखरच सॅल्युट !

अकोला येथील MIDC मधील सुदर्शन दाळ ॲग्रो आणि पौस डाळ मिल इंडस्ट्रीज या उद्योगाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी अत्यंत समर्थपणे स्वीकारली. विशेषतः मूग डाळ मिल विभागातील बिलिंग, बँकिंग आणि आर्थिक व्यवहार तसेच प्रशासकीय बाबी अत्यंत कुशलतेने, जबाबदारीने हाताळत मनीषा बजाज यांनी पतीसोबत खांद्याला खांदा लावून उत्पादन क्षेत्रात प्रत्यक्ष घेतलेला सहभाग एखाद्या कथे सारखं वाटत पण ही कथा नाही.

एकेकाळी योग्य व्यवस्थापनाअभावी अडचणीत आलेल्या उद्योगाला संघटन, शिस्त, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि चिकाटीच्या बळावर पुन्हा पूर्ण क्षमतेने उभे केले. रोजच्या कामगार व्यवस्थापनापासून प्रशासकीय निर्णयापर्यंतची सर्व जबाबदारी स्वतः पार पाडली.
दोन लहान मुली आणि सासू- सास-यांसह कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. घरातील कामे, कुटुंबाची काळजी आणि उद्योगाची धुरा अशा तिहेरी जबाबदारी समर्पणाने पार पाडत आहेत. घरचे कर्तव्य करून नियमितपणे फॅक्टरीत आणि उद्योगातील प्रत्येक कामात सक्रिय सहभाग इतर कुठल्याही व्यवस्थापनात दिसून येत नाही.
अकोला औद्योगिक क्षेत्रामध्ये एका महिलेनं इतक्या आत्मविश्वास आणि जिद्दीने पतीसोबत दाल मिल उद्योग पुन्हा सक्षमपणे सुरू ठेवणे हे निश्चितच अभिमानास्पद आहे. कठोर परिश्रम, कामात सातत्य, दूरदृष्टी आणि नैतिक जबाबदारीच्या जाणीवेने हा उद्योग उभारी घेऊन प्रगतीपथावर आहे.त्यांचे योगदान अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. अशा या महिला भगिनीला महिला दिवसाच्या शुभेच्छा देताना खरोखरच अंतःकरणात भावना उंचबळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!