Saturday, March 7, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला मार्गावर लक्झरी बसला भीषण आग !३० प्रवासी थोडक्यात बचावले

अकोला मार्गावर लक्झरी बसला भीषण आग !३० प्रवासी थोडक्यात बचावले

अकोला दिव्य न्यूज : अकोला मार्गावरील नांदुरा शहरातील आशीर्वाद हॉटेलसमोर एनएल ०७ बी ०६९४ क्रमांकाच्या खासगी बसला शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी अचानक आग लागल्याची घटना घडली.

अकोला दिव्य छायाचित्र

घटनेची माहिती मिळताच नांदुरा अग्निशामक दल, ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक, रुग्णवाहिका तसेच नांदुरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, वाहनातील सुमारे ३० प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!