Friday, March 6, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्याचे उद्योजक सुनील इन्नाणी मनपा स्विकृत सदस्य ! वंचित बहुजन...

अकोल्याचे उद्योजक सुनील इन्नाणी मनपा स्विकृत सदस्य ! वंचित बहुजन आघाडीने दिली संधी

अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई पुणे शहराच्या धर्तीवर अकोला शहरात यशस्वीपणे अद्ययावत बांधकाम प्रकल्प उभारणारे ख्यातनाम उद्योजक आणि माहेश्वरी समाजातील सक्रिय मार्गदर्शक सुनील इन्नाणी यांना वंचित बहुजन आघाडीकडून अकोला महापालिकांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले. स्विकृत सदस्यासाठी उतरत्या क्रमाने आवश्यक संख्याबळ वंचित बहुजन आघाडीकडे असल्याने त्यांची नियुक्ती सहज आहे.

वंचित बहुजन आघाडी धक्कातंत्राचा वापर करत राजकीयदृष्ट्या उपेक्षित समाजाला सत्तेत सहभाग देणे, हेच अकोला पर्टनचे सोशल इंजिनिअरिंग असून ते महाराष्ट्रभर प्रचलित आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब यांनी अकोला महापालिका स्विकृत सदस्यापदासठी माहेश्वरी समाजातील उद्योजक सुनिल इन्नानी यांना प्रतिनिधित्व दिले.

आज अकोला महानगरपालिकेच्या स्विकृत सदस्याचा अर्ज सुनिल इन्नानी यांनी दाखल केला. अर्ज दाखल करतांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, माजी जि.प.गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, महानगर अध्यक्ष तथा मनपा स्थायी समिती व गटनेते सदस्य निलेश देव, नगरसेवक उज्वला पातोंड, जयश्री बहाद्दुरकर, शेख शमशु शेख साबीर, पराग गवई, विकास सदांशिव, प्रविण पातोडे, चेतन गावंडे, योगेश चौधरी, शुभम दारोकार, जगदिश मुंदडा, उज्वल कुटाफळे, तुषार आसरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

अकोला दिव्य कुटुंबातील ते एक सहकारी सदस्य असून, त्यांनी आज राजकीय क्षेत्रात केलेला प्रवेश निश्चित यशस्वी होईल, यात शंका नाही. स्विकृत सदस्यापदावर नियुक्तीसाठी उतरत्या क्रमाने आवश्यक संख्याबळ असल्याने त्यांनी आपली भूमिका उघड केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!