Friday, March 6, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला मनपात गिरीश गोखले यांना पुन्हा संधी ! अनेकांचा हिरमोड

अकोला मनपात गिरीश गोखले यांना पुन्हा संधी ! अनेकांचा हिरमोड

अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिका स्विकृत सदस्यासाठी आज नाम निर्देशनपत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवशीच अकोला महानगर भाजपाकडून चार जणांच्या नावांची शिफारस करण्यात आली. यामध्ये अकोला महानगर भाजपाकडून अँड. गिरीश गोखले यांना पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील गोखले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासोबतच शहर आघाडीचे संस्थापक व माजी नगरसेवक सुनील मेश्राम, भाजपचे सरचिटणीस अँड. देवाशिष काकड आणि भाजप महिला आघाडीच्या चंदा शर्मा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.

अकोला महापालिका स्विकृत सदस्यासाठी वर्णी लाऊन घेण्यासाठी सगळ्यात जास्त इच्छुक असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. केवळ चार जागा आणि शेकडो इच्छुक असल्याने महानगर भाजपाला तारेवरची कसरत करावी लागत होती. मनपा निवडणूकीपुर्वी निलंबित झालेल्यांकडून तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्याचा घडामोडीत अँड गिरीश गोखले देखील सक्रिय होते. तद्नंतर निवडणुकीतही स्नेहा गिरीश गोखले यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची ताकदीने सुरुवात केली होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोखले यांची समजूत काढली. त्यामुळे गोखले यांची स्विकृत सदस्या पदावर नियुक्ती निश्चित होती. गिरीश गोखले यांचा २०१२ पासून सक्रिय राजकारणात सहभाग असून दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांसाठी असलेली तळमळ ही आपसुकच दिवंगत डॉ रामदास आंबटकर यांच्याकडून त्यांना शिकायला मिळाली. २०१४ ते २०१९ महानगरात प्रत्येक पदाधिकारी बूथप्रमुख यांच्याशी संपर्क साधून संघटन मजबूत केले.

अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शहर आघाडीने वीना अट समर्थन दिले आहे. भाजप नेते आणि माजी महापौर विजय अग्रवाल आणि शहर समितीचे अध्यक्ष सुनील मेश्राम यांच्यातील सामंजस्य सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर मेश्राम यांचा समावेश अपेक्षित होता. महानगर भाजपात २०१५ पासून सक्रिय आणि माजी केंद्रीय मंत्री संजयभाऊ धोत्रे, दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या तालमीत तयार झालेले व आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात लाभलेले पक्षात सक्रिय अँड. देवाशिष काकड यांना नियुक्ती देऊन, नवीन पिढीचे स्थान मजबूत केले गेले.

निवडणूकीत लालाजी यांच्या कुटुंबाचे व्यक्ती आणि ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व यादृष्टीने अजय शर्मा यांना उमेदवारी दिली होती. परंतु सागर भारूकाकडून शर्माला पराभव पत्करावा लागला होता. सामाजिक समिकरण संतुलनातून भाजप महिला आघाडीच्या चंदा शर्मा यांची नियुक्ती केली गेली आहे.भाजप महिला मोर्चाच्या पाहिल्या कार्यकाळापासूनच चंदाताई शर्मा यांनी कार्य केले. त्यांच्यात महिलांप्रती असलेली पक्ष बांधिलकी शिकण्याजोगती आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!