Sunday, March 1, 2026
No menu items!
No menu items!
HomeNagpur Blast News ! भीषण स्फोटात 15 जणांचा मृत्यू :...

Nagpur Blast News ! भीषण स्फोटात 15 जणांचा मृत्यू : 13 जण जखमी ; नागरिकांमध्ये मोठा रोष

Nagpur Blast News Update : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत झालेल्या मोठ्या स्फोटात 15 कामगारांचा मृत्यू झाला. तर 13 जण जखमी  झाल्याची घटना घडली आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह  इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्फोटनंतर परिसरात आग, नागरिकांमध्ये मोठा रोष : दरम्यान, या भीषण स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज होऊन एकच खळबळ उडालीय. तर या भीषण स्फोटात जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटनंतर परिसरात आगही लागली आहे.  दरम्यान, माहिती मिळताच पोलीस व अग्नीशामक विभागाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.  दुसरीकडे परिसरात मृतकांच्या नातेवाईकांनी परिसरात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये मोठा रोष उसळल्याचेही चित्र आता बघायला मिळत आहे. SBL कंपनीत सकाळी 7 वाजताच सुमारास हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  मात्र या स्फोटाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कंपनीचे सुरक्षिततेबद्दल मोठं दुर्लक्ष,आमदार ठाकूरांचा  आरोप

दरम्यान, या स्फोटाच्या अपघातावर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी 15 मृत्यू आणि 20 जखमी झाले असल्याचे सांगितले  आहे. या ठिकाणी कंपनीकडून सुरक्षिततेबद्दल मोठं दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केलाय. प्रशिक्षणाशिवाय  व कुठलीही  आवश्यक ती काळजी न घेता कामगार वापरले जातात, असा त्यांचा आरोप आहे.

वर्षभरापूर्वीही घडला होता असाच स्फोट : दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील याच राऊळगाव  शिवारातील कोतवालबड्डी शिवारातील एशियन फायर वर्क्स या एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्येही वर्षभरापूर्वी (16 फेब्रुवारी) दुपारी दोन वाजताच्या सुमारास एशियन फायर वर्क (Asian Explosive Fire Work) या कंपनी मध्ये मोठा स्फोट झाला होता. फटाक्यांची वात तयार करताना ही घटना घडली होती. स्फोटाच्या वेळेला कंपनीत मोठ्या संख्येने कामगार काम करत होते. मात्र, ज्या विशिष्ट प्लांटमध्ये हा स्फोट झाला, त्या ठिकाणी चार कामगार कार्यरत होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता, तर इतर दोघे जखमी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!