Friday, February 13, 2026
No menu items!
No menu items!
Homeसरला माहेश्वरी अनंतात विलीन ! टीव्ही पत्रकारितेतील सुवर्ण युगाचा अंत

सरला माहेश्वरी अनंतात विलीन ! टीव्ही पत्रकारितेतील सुवर्ण युगाचा अंत

अकोला दिव्य न्यूज : अचूक उच्चार, मृदू आवाज आणि बातम्या वाचण्याची शालीन शैली यामुळं प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेल्या आणि दुरदर्शनाच्या सर्वात जुन्या निवेदिका सरला माहेश्वरी यांच वयाच्या ७१ व्या वर्षात निधन झालं. त्यांच्या निधनाने टीव्ही पत्रकारितेतील सुवर्ण युगाचा अंत त्यांच्या निधनानंतर टीव्ही वृत्त वाहिन्यांच्या गर्दीतला एक आश्वासक चेहरा गमवल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. दिल्लीतील निगम बोध घाट इथं माहेश्वरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संग्रहित छायाचित्र

जेव्हा दूरदर्शन हेच घराघरात माहिती पोहोचवण्याचं एकमेव साधन होतं, तेव्हा सरला माहेश्वरी बातम्यांचा एक विश्वासार्ह चेहरा बनल्या होत्या. त्यांनी १९७६ मध्ये दिल्ली विद्यापीठातून पीएचडी करत असताना अँकर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सरला यांनी आपल्या तीन दशकांहून अधिकच्या करिअरमध्ये टेलिव्हिजनचे स्वरूप बदलताना पाहिलं. ‘ब्लॅक अँड व्हाईट’ ते ‘कलर टीव्ही’ या प्रवासात त्या दूरदर्शनच्या हिंदी बातमीपत्रांचा अविभाज्य भाग होत्या. मधल्या काळात त्यांनी लंडनमध्ये BBC सोबतही वृत्तनिवेदक म्हणून काम केलं होतं.

टीव्ही पत्रकारितेतील सुवर्ण युगाचा अंत ! . सरला माहेश्वरी यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ऑल इंडिया महिला काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. सरला यांची कामाप्रती असलेली निष्ठा, त्यांची विश्वासार्हता आणि शालीनता येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत

सरला माहेश्वरी यांना त्यांच्या साधेपणासाठी आणि संयमित सादरीकरणासाठी ओळखलं जायचं. त्या काळी टेलिप्रॉम्प्टर नसल्यामुळं त्यांना अनेक बातम्या लक्षात ठेवून वाचाव्या लागायच्या. त्यांच्या कामाप्रती असलेल्या या निष्ठेमुळेच त्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनल्या होत्या. आज सोशल मीडियावर त्यांचे अनेक चाहते जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!