Friday, February 13, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड. अजय वाघमारे ! महिला उपाध्यक्षपदी अँड. शितल...

अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड. अजय वाघमारे ! महिला उपाध्यक्षपदी अँड. शितल गवई

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्हा न्यायालयातील अकोला बार असोसिएशनची पुढील एक वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठीच्या चुरशीच्या लढतीत अँड.अजय वाघमारे यांनी अँड हेमंतसिंग मोहता यांचा 49 मतांनी पराभव केला. नवनिर्वाचित अध्यक्ष अँड वाघमारे यांना 682 तर अँड. मोहतांना 633 मते मिळाली. अँड वाघमारे यांनी 2016 मध्ये अध्यक्ष म्हणून कामकाज केले आहे. अध्यक्षपदाचा निवडणूकीत अँड. संजय देशमुख यांना 11 मते मिळाली. मात्र त्यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी अँड. वाघमारे यांना समर्थन जाहीर केले होते.

महिला उपाध्यक्षपदासाठी 5 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यापैकी अँड. शितल देवानंद गवई यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी अँड शारदा मनोहरलाल मल्होत्रा यांचा तब्बल 174 मतांनी पराभव केला. अँड गवई यांना 552 तर अँड.मल्होत्रा यांना 378 मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी 3 उमेदवारांमध्ये लढत होऊन अँड. विजय प्रभाकरराव भामरे यांनी तब्बल 300 मतांनी निकटचे प्रतिस्पर्धी अँड. राहुल पंजाबराव वानखडे यांना पराभव पत्करावा लावला. हा एक उच्चांक असून सहसचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत अँड.प्रमोद देवीदास कोरडे यांनी 700 तर अँड.अक्श मदन भगत यांना 497 आणि अँड.पवनेश अग्रवाल यांना 121 मते मिळाली. अँड.कोरडे 203 मताधिक्याने निवडून आले.

विधिज्ञांच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात 6 तर महिला उपाध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात 11 आणि सहसचिवाच्या मतदानात 14 मते अपात्र ठरविण्यात आली. विशेष म्हणजे उपाध्यक्षाच्या मतदानात 0 शून्य मतं अपात्र होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!