Wednesday, February 11, 2026
No menu items!
No menu items!
Homeसाता समुद्रापल्याड ! संत गजानन महाराज यांचा प्रगट दिवस साजरा

साता समुद्रापल्याड ! संत गजानन महाराज यांचा प्रगट दिवस साजरा

अकोला दिव्य : विदर्भ पंढरी शेगाव येथील गजानन महाराज यांचे देशभरात लाखो भक्त असून या भक्तीला देशाची मर्यादा देखील उरली नाही. शेगावीचा राणा अर्थात संत गजानन महाराजांची ख्याती साता समुद्रापल्याड पोहोचली आहे. नुकताच महाराजांचा प्रगट दिन शेगावासह सर्वत्र साजरा करण्यात आला.तसाच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे सतत चर्चेत असलेल्या अमेरिका देशातही यंदाही गजानन महाराज प्रगट दिन विधिवत व उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

गजानन महाराजांचा प्रगटदिन अमेरिकेतील ऑलैंडो येथे हिंदू सोसायटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा मंदिरात उत्साह व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी व साडेतीन दशकापूर्वी अमेरिकेत स्थायिक झालेले प्रशांत सावजी यांनी यासाठी पुढाकार घेतला.

अनेक वर्षांपासून त्यांच्या पुढाकाराने प्रगट दिन साजरा करण्यात येतो. यंदाचा प्रगट दिन देखील याला अपवाद नव्हता. यंदाच्या उत्सवात डॉक्टर सागर जोशी आणि डॉ. नेहा सावजी यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यंतर विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, भजन व आरतीचे आयोजन करण्यात आले. शेकडो आबालवृद्ध भाविकांनी उत्सवाला हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.

या सोहळ्याचे आयोजन मूळ डोणगाव निवासी व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचे बंधू प्रशांत सावजी व मीनल सावजी यांनी केले. महाप्रसादाच्या तयारीसाठी नूतन ओक, सुयशा गुळगुळे, सुरभी महाजन, कल्पना कीर्तने आणि नयना कावळे आदींनी सहकार्य केले. यंदाचाही कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. महाराजांची कृपा सर्वांवर सदैव राहो, अशी प्रार्थना भाविकांनी श्रींच्या चरणी अर्पण करत कार्यक्रमाची सांगता केली.

डोणगाव ते अमेरिका
अनेक वर्षांपूर्वी डोणगावला श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सुबोध सावजींच्या शासकीय निवासस्थानी हत्ती-घोड्यांसह आगमन व्हायचे. त्यामुळे लहानपणापासून श्रींचे भक्त असलेले सावजी यांनी अमेरिकेत स्थायिक झाल्यावरही हा भक्तीभाव अखंडपणे जपला. प्रगटदिन उत्सव, ही त्यांची महाराजांवरील श्रद्धा आणि भारतीय संस्कारांची जपणूक केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!