अकोला दिव्य न्यूज : लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊनकडून मागील २९ वर्षांपासून ह्रदय रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा स्व.मधुकरराव फुलारी यांच्या स्मृति प्रित्यर्थ 30 वे शस्त्रक्रिया शिबीर वाडीया हॉस्पीटल, ए ब्युटीफुल, फॉर्म लाईफ फाऊंडेशन तसेच अकोल्याचे लोटस सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, स्पंदन हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.

उद्घाटक म्हणून पुसद येथील डॉ.संजय भांगडे तरमुख्य अतिथी म्हणून आ.वसंत खंडेलवाल, वाडीया हॉस्पीटलचे डॉ.के.एन.भोसले, डॉ.श्रीपाल जैन, ए ब्युटीफुल लाईफ फाऊंडेशन मुंबईच्या मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.पारूल शाह, अकोल्याचे डॉ.अमरीश खटोड, डॉ.विशाल काळे, डॉ.तुषार चरखा, पी.डी.जी.रमाकांत खेतान, डॉ.कैलाश मुरारका, किशोर गरड, लॉयन्स क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. मनोज अग्रवाल, सचिव प्रशांत फुलारी, कन्वेनर अमित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख सुभाष चांडक, व्यासपीठावर उपस्थित होते.

या कॅम्प मध्ये तब्बल 200 लोकांचे टु डी इको डॉ. विशाल काळे यांनी केले. या मध्ये 45 रूग्णांची तपासणी करून 12 रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही शस्त्रक्रिया अकोला येथे तर उर्वरीत शस्त्रक्रिया मुंबईला होणार आहे, मागील काही दिवसात 7 बाळांवर वाडीया हॉस्पीटल येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या मध्ये अवघ्या 20 दिवसांचा बालकाचा समावेश आहे, याकरीता डॉ श्रीपाल जैन व डॉ पारूल शाह यांचे योगदान लाभले, मागील 29 वर्षात 2 हजार 179 रूग्णांना लाभ मिळून दिल्याबद्दल सुभाष चांडक यांना पद्मश्री मिळाला पाहिजे असे मत प्रमुख अतिथिनी व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ के.एन.भोसले,डॉ.श्रीपाल जैन व डॉ. पारुल शाह यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य अतिथी आ.वसंत खंडेलवाल यांनी डॉक्टर्स व रूग्णांसोबत चर्चा करून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. शासनाकडून मदत लागल्यास त्याकरीता प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली. वर्तमानपत्राद्वारे रूग्णांना या उपक्रमाची माहिती देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सुनिल जेसवानी, रितेश गोयनका, हरीश खेतान, प्रभाकर भिसे, भुतडा,जय फुलारी, रवि चांडक, देवेन्द्र अग्रवाल, राजीव पनीकर, डॉ.वर्षा अग्रवाल, डॉ.अर्चना अग्रवाल, डॉ.नितीन अग्रवाल, मनिष अग्रवाल, योगेश अग्रवाल,डॉ.छाया अग्रवाल, शकुंतला खटोड, विनित बियाणी, सुधिर रांदड, डॉ. सुनीता अग्रवाल, प्रजोत फुलारी, द्वारका चांडक, सी.ए.मनोज चांडक, डॉ. सुनील थावरानी, घनश्याम जोशी, किशोर गरड, नरेश चोपडा, अशोक केला, तेजस झांबड, शैलेश शर्मा, गिरीश धरमठोक, डॉ. मिनल झगडे, डॉ. वंदना वासुकर, मिनाक्षी दाड, यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश आनंदानी, किशोर कापडे, दयाराम रोहडा, महेश संतानी, संतोष कळमशेरे, महेश मनवाणी, प्रमोद चांडक, राहूल सावजी, सुहास जैन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शरद चांडक, शैलेन्द्र कागलिवाल, डॉ.उमेश अग्रवाल, जगदीश राठी, सी.ए.रमेश बाहेती, घनश्याम भैय्या, गौतम भैय्या, गौरव अग्रवाल, सुहानी जैन, आशिष अग्रवाल,राहूल अग्रवाल, संगीता अग्रवाल, चंचल अग्रवाल,अनिल चांडक,विजय गोडा, शशि मुरारका यांची उपस्थिती लाभली. संचालन डॉ. निशाली पंचगाम तर आभार प्रदर्शन सुभाष चांडक यांनी केले.

