अकोला दिव्य न्यूज : शिवपुत्र स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्य प्रभावीपणे सादर करणाऱ्या पातुर येथील तुळसाबाई कावल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा छावा संघटनेतर्फे सत्कार करण्यात येऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. पातुर येथे तुळसाबाई कावल विद्यालयाचे प्रांगणात शेकडो विद्यार्थ्यांचे उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेरार एज्युकेशन सोसायटी पातूरचे व्यवस्थापक तथा माजी प्राचार्य विजयसिंह गहिलोत होते. प्रमुख अतिथी म्हणून छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, दास मोबाईलचे संचालक रितेश मिर्झापुरे, स्नेह प्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमन सिंह गहिलोत, छावाचे जिल्हा संघटक निवृत्ती वानखडे, उपाध्यक्ष गोपाल पाटकर, बाळासाहेब लाहोळे, डॉ. संतोष भिसे, अनिरुद्ध भाजीपाले, श्रीनाथ पहेलवान, देवेंद्र मोहोकार, तालुकाप्रमुख सोनु गिरी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी सादर करण्यात आलेल्या या महानाट्यातील सर्वच कलावंतांनी दमदार भूमिका करून संभाजी युग प्रेक्षकांसमोर सादर केले. छावा संघटनेने महानाट्याची दखल घेऊन या नाटकातील विद्यार्थी कलावंतांचा कौतुक सोहळा घडवून आणला. या नाटकात संभाजी राजांची भूमिका साकारणाऱ्या उज्ज्वल कांबळे, अभिजीत तायडे, कवी कलश साकारणाऱ्या अमित खंडारे, येसूबाईच्या भूमिकेतील स्वरा पवार, बहिर्जी नाईकाचे भूमिकेतील हर्षल भुसांडे व इतरही कलावंतांचा याप्रसंगी स्कूल बॅग देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रदीप खाडे, निवृत्ती वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. कार्यक्रमास मदर इंडिया कॉन्व्हेंट पातुरचे प्राचार्य महेंद्र खंडारे, उप प्राचार्य एस. बी. चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर. एस. ढेंगे, पर्यवेक्षिका पी. एम.कारस्कर, पर्यवेक्षक एस. आर. मुखाडे, सहाय्यक शिक्षक अर्जुन गहिलोत यांचासह शाळेतील शिक्षक वृंद व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन सुभाष इंगळे यांनी केले.
