Saturday, February 7, 2026
No menu items!
No menu items!
Homeईश्वर सेवेला समर्पित उपक्रम ! विदर्भाच्या पंढरीत वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा

ईश्वर सेवेला समर्पित उपक्रम ! विदर्भाच्या पंढरीत वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा

अकोला दिव्य न्यूज : विदर्भातील प्रति पंढरपूर असलेले शेगावीचा राणा संत श्री गजानन महाराज यांच्या उद्या रविवार ८ फेब्रुवारीला साजरा केला जात असलेल्या प्रगट दिनानिमित्त शेगांव येथे लाखो वारकऱ्यांची मांदियाळी होत आहे.अकोला शहरासह पंचक्रोशीतील हजारो वारकरी पायदळ वारी सोहळ्यात सहभागी होऊन शेगांवला जात आहेत.गजानन भक्तांची सेवा म्हणून आरोग्य यंत्रणा आपल्या दारी, या विशेष मोहिमेअंतर्गत, श्री सत्यसाईबाबा सेवा संघटना आणि निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

पायदळ वारी दरम्यान अकोला ते नागझरी या मार्गावर दोन ठिकाणी प्राथमिक उपचार केंद्रे उभारण्यात आली होती. विशेषत आज शनिवार ७ फेब्रुवारी रोजी त्याग मुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी, संध्याकाळी वारकरी भक्तांना वैद्यकीय मदत व आवश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. या सेवेमध्ये हजारो भक्तांनी सहभाग घेतला आणि लाभ घेतला.

श्री.सत्यसाई सेवा संघटनेचे डॉ.अशोक ओळंबे, डॉ प्रमोद हेलगे, डॉ. तोष्णीवाल,डॉ.विवेक गोतमारे, डॉ.सुमित गोतमारे, डॉ.अजय खरात, डॉ.तुषार चरखा, डॉ.टापरे मॅडम, डॉ.सतिश चव्हाण, डॉ.मधुसुदन अपतुलकर, डॉ. प्रकाश मेटांगे आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

अकोला दिव्य

संपूर्ण उपक्रम सत्यसाई सेवा संघटना जिल्हा अध्यक्ष किशोर रत्नपारखी आणि निलेश देव मित्र मंडळ प्रमुख व नगरसेवक आणि मनपा गटनेता निलेश देव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

भविष्यातही वारकरी बंधू-भगिनींसाठी अशीच सेवा देण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. सेवेमध्ये योगदान देणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांमध्ये सुनील सरोदे, रवि गाडे, हरीश मेहरे, नवनीत सरोदे, प्रणव वारकर, रमेश गोतमारे,जयंत सरदेशपांडे, सातपुते काका, राजेंद्र गुणलवार, मोहन भिरड, विजय वाघ, रामहरी हांगे ,निलेश दुधलम, राजु कनोजिया, मंगेश भोळे,रमेश पवार, शैलेश देव, भास्करराव बैतवार, सार्थक देव , सुनिल देशपांडे यांचा समावेश होता.

विदर्भाच्या पंढरीत वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा पुरविणे हाच खरा ईश्वरसेवेचा मार्ग असल्याची भावना सर्व सेवेकरी आणि डॉक्टरांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!