Wednesday, February 4, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील 'बिंदी घर' दुकानात ग्राहक महिलेवर वारंवार दुराचार ! 3 जणांना अटक

अकोल्यातील ‘बिंदी घर’ दुकानात ग्राहक महिलेवर वारंवार दुराचार ! 3 जणांना अटक

अकोला दिव्य न्यूज : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका कॉस्मेटिक दुकानदाराने आपल्या साथीदारांसह अश्लील चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली. पीडित महिलेवर धर्मांतर करण्यासाठीही आरोपींनी दबाव टाकल्याचा खळबळजनक प्रकार घडला. अत्याचार असह्य झाल्याने पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली.

शहरातील गांधी मार्गावरील परी बिंदी घर या कॉस्मेटिक दुकानाच्या संचालकाने ग्राहक असलेल्या एका महिलेचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला. त्यावर तो वारंवार संपर्क साधत होता. दुकानात नवीन माल आणल्याचे कारण करून त्याने महिलेला दुकानात बोलावून घेतले. दरम्यान, त्याने आपल्या साथीदारांसह बळजबरी अत्याचार केला. त्याची चित्रफित तयार केली. ती चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन चार नराधमांनी महिलेवर २०२४ ते २०२६ दरम्यान वारंवार अत्याचार केला. त्यानंतर विवाहित महिलेवर धर्मांतर करण्याचा दबाव देखील टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. धर्मांतर केले तर अश्लील चित्रफित डिलिट करू, असे आरोपी महिलेला म्हणाले.

आरोपींकडून सातत्याने अत्याचाराचे प्रकार वाढत असल्याने तणावातून पीडित महिलेने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शहर कोतवाली पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी रहेमान उर्फ मोहम्मद मुस्तफा, चंदू राजू वानखडे, रहेमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद तस्लीम तेली यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद आसिफ उर्फ बाबु मोहम्मद सलीम तेली, चंदु वानखडे आणि इमरान खान यासीन खान उर्फ गॅरेजवाला यांची ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. तसेच आरोपी रहेमान उर्फ मोहम्मद मुस्तफा मोहम्मद सलीम तेली हा गुन्हा दाखल होण्यापुर्वी पासुन त्याची तब्येत ठीक नसल्याने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचार घेत आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर त्याचा अटकेची कारवाई करण्यात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!