Wednesday, February 4, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोलेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही !महापौर खेडकर यांची ग्वाही

अकोलेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही !महापौर खेडकर यांची ग्वाही

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव, नवनिर्वाचीत महापौर, उपमहापौर, नगरसेवकांचा सत्कार

अकोला दिव्य न्यूज : अकोलेकरांनी भारतीय जनता पक्ष आणि आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आपल्या महापौर पदाच्या कार्यकाळात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर शारदा रणजित खेडकर यांनी दिली. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त गुडधी येथील श्री संत नरहरी सेवा समितीतर्फे आयोजित पुण्यतिथी उत्सवात निर्वाचीत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी महापौर शारदा खेडकर बोलतं होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल माळवी सोनार महासंघाचे माजी अध्यक्ष विलासराव अनासाने तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर गुंबळे, सोनार समाज संघटनेचे अध्यक्ष रामरतन बुडूकले, दैनिक मातृभुमीचे संपादक श्रीकांत पाचकवडे, सेवानिवृत्त न्यायाधीश श्रीरामजी हिरूळकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक प्रदिप पिंजरकर, केशवराव खांडेकर, अऩिल काटोले, अरूण शेरेकर, अमोल पाचकवडे, श्रीकृष्णराव धरमकर, विशाल काटकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, संपादक श्रीकांत पाचकवडे, नगरसेविका अभय खुमकर, नगरसेवक संदिप शेगोकार, नगरसेविका पल्लवी मोरे, नगरसेविका शिल्पा वरोकार, नगरसेविका गावंडे आदींचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन महासंघाचे अध्यक्ष अनासाने, श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सकाळी अभिषेक, होमपुजा, आरती,आणि श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पालखी सोहळा व मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये श्रीनटेश्वर महिला भजन मंडळ, मोठी उमरी, महालक्ष्मी महिला भजनी मंडळ, विठ्ठल नगर यांचा उर्स्फुंत सहभाग होता.

कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत नरहरी सेवा समिती गुडधीचे अध्यक्ष संजय अनासाने, कार्याध्यक्ष जयकृष्ण माळोकार, उपाध्यक्ष चंद्रकांत हिरूडकर, उपाध्यक्ष गजानन माळोकार, सचिव प्रमोद बुटे, कार्याध्यक्ष अरविंद तळोकार, सहसचिव रमेश प्रांजाळे, सदस्य गोपालराव लोणकर, गजानन उज्जैनकर, ओमप्रकाश मानेकर, तपेश्वर शेरेकर, प्रविण मांडळे, भरत बुडूकले यांच्यासह सर्व पदाधिकारी व समाजबांधवांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास सोनार समाजातील महिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

स्व. श्रीधरसा सागळे स्मृती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांना ५१०० स्कॉलरशिप

सोनार समाजातील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास आर्थिक पाठबळ देण्यासाठी संपादक श्रीकांत पाचकवडे यांनी त्यांचे आजोबा व महात्मा गांधी विद्यालयाचे संस्थापक संचालक स्वर्गीय श्रीधरसा शिवरामसा सागळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ५१०० रुपये रोख स्कॉलरशिप दिली. यावेळी समाजबांधवांनी गरजू विद्यार्थ्यांच्या उज्वल शैक्षणिक भविष्यासाठी सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.

महिलांची भरगच्च उपस्थिती
या कार्यक्रमास सोनार समाजातील महिलांची भरगच्च उपस्थिती असल्याचे दिसून आले. संत नरहरी महाराज पालखी मिरवणुकीत विविध वेषभुषा करून आपल्या महिलांनी उर्स्फुंत सहभाग घेतला. या कार्यक्रमास सुवर्णकार महिला मंडळाच्या उपाध्यक्षा मनिषा अनासाने, सचिव सुचिता अनासाने, कोषाध्यक्ष छाया पाचकवडे, सहसचिव कुमूद मांडळे, माजी अध्यक्ष सिमा पिंजरकर, विशेष कार्यकारिणी सदस्य मनिषा बुटे, संगिता लोणकर, अनिता तळोकार आदी पदाधिकारी व महिला सदस्य उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!