Tuesday, February 3, 2026
No menu items!
No menu items!
Homeसावधान ! अकोल्यात ग्रुप अ‍ॅडमिनसह सदस्यांवर कारवाई ? व्हॉट्सॲपवर रेल्वे तिकिटांची काळाबाजारी

सावधान ! अकोल्यात ग्रुप अ‍ॅडमिनसह सदस्यांवर कारवाई ? व्हॉट्सॲपवर रेल्वे तिकिटांची काळाबाजारी

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरात रेल्वे तिकिटांची अवैध खरेदी-विक्री करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अनेक व्हॉट्सॲप ग्रुप्सची माहिती समोर आली असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ग्रुप्सच्या माध्यमातून रेल्वे तिकिटांची खरेदी व विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे, जो प्रकार कायद्यानुसार गंभीर गुन्हा ठरतो.

कायदे तज्ज्ञांच्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमातून रेल्वे तिकिटांचा व्यापार करणे हा रेल्वे ॲक्ट तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) ॲक्ट अंतर्गत दंडनीय अपराध आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर मोठा दंड, अटक तसेच कारावासाची शिक्षा होण्याची तरतूद आहे. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ तिकीट खरेदी किंवा विक्री करणारेच नव्हे, तर अशा व्हॉट्सॲप ग्रुप्सचे अ‍ॅडमिन देखील तितकेच दोषी धरले जातात. ग्रुपच्या माध्यमातून जर बेकायदेशीर तिकीट व्यवहार होत असतील, तर त्या ग्रुपचा अ‍ॅडमिनही थेट कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येऊ शकतो.

प्रशासन व कायदेविषयक तज्ज्ञांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “कायद्याचे अज्ञान कोणालाही माफी देत नाही.” त्यामुळे नागरिकांनी वेळेत सतर्क राहून कोणत्याही बेकायदेशीर व्यवहारापासून दूर राहणे आवश्यक आहे. दरम्यान, नागरिकांना प्रशासनाकडून पुढील सूचना देण्यात आल्या आहेत.

रेल्वे तिकिट खरेदी-विक्रीसाठी चालवले जाणारे सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्स तात्काळ बंद करावेत, अनधिकृत पद्धतीने तिकीट खरेदी किंवा विक्री करू नये, फक्त अधिकृत IRCTC वेबसाईट/ॲप किंवा रेल्वे तिकीट काऊंटरचाच वापर करावा.

ही बातमी सार्वजनिक हित व कायदेशीर जनजागृतीच्या उद्देशाने प्रसारित करण्यात येत असून, नागरिकांनी याची गंभीर दखल घ्यावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!