अकोला दिव्य न्यूज : Mumbai Pune Budget 2026 Benefits : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये रोजगार, कौशल्ये व सर्वसमावेशक विकासावर जोरदार भर देण्यात आला आहे. शेतकरी आणि विद्यार्थ्यांपासून ते सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, प्रवासी, तरुण व्यावसायिकांपर्यंत, २०२६ च्या अर्थसंकल्पात सामान्य माणसासाठी अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे देण्यात आले आहे.असे अकोला शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि ए.सी.सी.ई (इ)चे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, पंकज रमेशचंद्र कोठारी यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026–27 यांनी आवास क्षेत्रासाठी सकारात्मक आणि संतुलन राखले आहे. पंतप्रधान आवास योजनेची सातत्यता, भांडवली खर्चात वाढ आणि मूलभूत सुविधांवर भर देण्यात आले. यामुळे परवडणाऱ्या घरांना गती मिळेल आणि यामाध्यमातून रोजगारनिर्मिती आणि सर्वांसाठी घर (Housing for All) हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बळ मिळेल.असं कोठारी यांनी सांगितले..

टॅन घेणे गरजेचे नाही
सध्या, जर एखादी व्यक्ती निवासी विक्रेत्याकडून स्थावर मालमत्ता खरेदी करत असेल, तर त्या व्यक्तीला उद्गम कराची कपात करण्यास टॅन मिळवण्याची आवश्यकता नसते.
परंतु, जेव्हा स्थावर मालमत्तेचा विक्रेता अनिवासी भारतीय असतो, तेव्हा खरेदीदाराला उद्गम कराची कपात करण्यासाठी टॅन मिळवणे आवश्यक असते. यामुळे खरेदीदारावर अनावश्यक अनुपालनाचा भार पडतो, हे टाळण्यासाठी अशा व्यवहारात उद्गम कर हा करदात्याच्या पॅन वर भरता येईल. ही तरतूद १ ऑक्टोबर, २०२६ पासून लागू होईल.यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास कोठारी यांनी व्यक्त केला.
