अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिकेच्या राजकारणात प्रत्येक पक्षात राजकीय घडामोडींना वेग आला असून नगरसेवक निलेश देव यांची वंचित बहुजन आघाडीचे गटनेता म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, अँड संतोष रहाटे, ज्ञानेश्वर सुलताने यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली.

या बैठकीत महापालिकेतील आगामी भूमिका आणि नागरिकांच्या प्रश्न चर्चा करण्यात आली. त्यानंतर, सर्वानुमते नगरसेवक निलेश देव यांची वंचित बहुजन आघाडीच्या महापालिका गटनेतेपदी नियुक्ती करण्यावर सर्वसहमतीने शिक्का मोर्तब केला.सामाजिककार्यासह निलेश देव सातत्याने आंदोलनात्मक भुमिका घेतात. त्यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेत वंचितचा आवाज अधिक सक्षमपणे मांडला जाईल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

शोषित, वंचित आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्या हक्काच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हेच आपले पहिले व अखेरचे कर्तव्य असून, यापुढेही कायम राहील. पक्षश्रेष्ठी बाळासाहेब आंबेडकर यांनी टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू, असं निलेश देव यांनी सांगितले.या बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवक पराग गवई, जयश्री बहादूरकर, उज्वला पातोडे, शेख शमसु कमर शेख साबीर उपस्थित होते.
