अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्याचा निकाल आज बुधवार २१ जानेवारी २०२६ रोजी अकोला जिल्हा मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी बी.कचरे जाहीर करणार आहेत. या खटल्यातील सुनावणीत सरकार पक्षाची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम आज निकाल जाहीर होण्याच्या वेळी न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी काल रात्रीच अकोल्यात आले. या प्रकरणाच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.

अकोला येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी बी.कचरे यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्रीराम गावंडेसह १५ जण या प्रकरणात आरोपी आहेत. प्रकरणातील एकूण १५ आरोपींपैकी दीपाली गावंडे, नम्रता गावंडे, प्रवीण गावंडे व बार्शिटाकळी येथील मोहम्मद शेख साबीर यांच्या विरोधात ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे या प्रकरणातून त्यांना दोषमुक्त ठरवले तर या बाबतीत हरकत राहणार नाही, असं अँड.निकम यांनी अंतिम युक्तिवादात (कॉंउटर आरग्युमेंट) स्पष्ट केले आहे.
प्रकरणातील श्रीराम गावंडेसह अन्य ११ आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अंतिम युक्तिवादात केली आहे. आज न्यायालयाच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागले असून सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.
