Sunday, January 18, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्याच्या पोट्याचा शतकी धमाका !विदर्भसंघाकडून १२८ धावांची खेळी

अकोल्याच्या पोट्याचा शतकी धमाका !विदर्भसंघाकडून १२८ धावांची खेळी

अकोला दिव्य न्यूज : Atharva Taide Slam Century  Vijay Hazare Trophy Vidarbha vs Saurashtra Final:  विदर्भाचा सलामीवीर फलंदाज अथर्व तायडे याने विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक झळकावत जोरदार छाप सोडली. सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम सामन्यात विदर्भ संघाच्या डावाची सुरुवात करताना तायडेने ९७ चेंडूंत शतक पूर्ण केले. या स्पर्धेत अकोल्याच्या अथर्वच्या बॅटमधून पाच वर्षांनंतर शतक पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा अथर्व तायडे हा फक्त १६वा फलंदाज ठरला आहे. विदर्भ संघाकडून याआधी या स्पर्धेच्या फायनलमध्ये ध्रुव शोरेच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले होते. 

सौराष्ट्र संघाने टॉस जिंकून विदर्भ संघाला दिली फलंदाजी…. विदर्भ संघ देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित एकदिवसीय स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सलग दुसऱ्या हंगामात फायनल खेळत आहे. पहिली ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरला आहे. नाणेफेक गमावल्यावर विदर्भ संघाकडून अथर्व तायडे आणि अमन मोखाडे यांनी संघाच्या डावाची सुरुवात केली. सेमी फायनलमध्ये शतक झळकावलेला अमन ४५ चेंडूंमध्ये ३३ धावा करून माघारी फिरला.  अमन बाद झाल्यानंतर अथर्व तायडे आणि यश राठोड जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची दमदार भागीदारी रचली.  अकोल्याच्या पोट्याची विदर्भसंघाकडून १२८ धावांची धमाकेदार खेळी
९७ चेंडूंत शतक साजरे केल्यावर अथर्व तायडेची आक्रमक फलंदाजी सुरूच राहिली. अखेर तो १२८ धावांची दमदार खेळी करून बाद झाला. सौराष्ट्रच्या अंकुर पनवारने त्याला बाद केले. आपल्या या शतकी खेळीत अथर्वने १५ चौकार आणि ३ षटकार मारले.  फायनल पाहण्यासाठी बीसीसीआयचे निवडकर्तेही उपस्थितीत आहेत. त्यांच्यासमोर IPL मधील अनसोल्ड राहिलेल्या अथर्वनं दमदार फलंदाजीचा नजराणा पेश केला.

७ सामन्यांत चौथ्यांदा ५० पेक्षा अधिक धावा

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामात अथर्व तायडे कमालीच्या फॉर्ममध्ये दिसला. फायनलपूर्वीच्या ६ सामन्यांत त्याने ३ अर्धशतके झळकावली होती. बडोदा संघाविरुद्ध त्याने ६५ धावा, आसाम विरुद्ध ८० धावा आणि दिल्ली विरुद्ध त्याच्या बॅटमधून ६२ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. देशांतर्गत क्रिकेटमधील इराणी चषक स्पर्धेच्या फायनलमध्येही त्याने शतक झळकावले होते. IPL च्या गत हंगामात काव्या मारनने बोली लावली, पण….

अथर्व तायडे आयपीएल २०२५ च्या लिलावात काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना दिसला होता. पण SRH च्या संघाने गत हंगामात  २५ वर्षीय बॅटरला फक्त एका सामन्यात संधी मिळाली. आगामी २०२६ च्या हंगामाआधी सनरायझर्स हैदराबादच्या संघाने त्याला रिलीज केले. मिनी लिलावात अथर्व तायडेनं ३० लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. पण त्याच्यावर कुणीही बोली लावली नव्हती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!