अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिका निवडणुक संग्रमात आता प्रचाराला वेग आला असून शहरातील प्रभाग १५ मध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) युतीच्या उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधताना सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. उमेदवारांना प्रभाग १५ च्या मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, असा दावा त्यांच्या समर्थकांचा आहे. प्रभाग १५ मध्ये बालाजी नगर, कीर्ती नगर, स्वावलंबी नगर, व्हीएचबी, आदर्श कॉलनी, संभाजी नगर, नगर परिषद कॉलनी, दत्त कॉलनी, काँग्रेस नगर, महसूल कॉलनी, सिंधी कॅम्प या भागांचा समावेश असून मतदारांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (भाजपा) महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. मतदारांनी कमळ चिन्हांचे बटन दाबून भाजपला मतदान करावे.आम्ही त्यांचा विश्वास कधीही तुटू देणार नाही, असा विश्वास हरिश अलिमचंदानी यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे ज्यामध्ये सांडपाणी निचरा, पथदिवे, चांगले रस्ते, भूमिगत मार्ग, चांगले शिक्षण, आरोग्य, महिला आणि बाल कल्याण, शिक्षण, युवा आणि क्रीडा, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी सुविधा, रोजगार आणि स्थानिक विकास, पर्यावरण आणि हरित विभाग यासारख्या सर्व मूलभूत सुविधांचा समावेश आहे.

माजी नगराध्यक्ष हरीश अलिमचंदाणी, बाळ टाले व शारदा रणजित खेडेकरसह चारही उमेदवार प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्यासोबत प्रभाग १५ भाजपाचे विनोद मनवानी, अनूप शर्मा, स्वानंद कोंधलेकर, रमेशभाई अलिमचंदानी, मणिभाई जसमतिया, प्रकाश अलिमचंदानी, शेखर शेळके,अजय बोधानी,सुशील राजपाल, गिरिधर पोपटानी, सुधीर बेलानी, उदय जोशी, दीपक मनवानी, बबलू धनवानी, सोनू जसूजा, मनीष बुंदेले, हरीश अमानकर पाटिल, श्रीकांत गावंडे, ऋषिकेश महले, शुभम् महल्ले, स्वप्निल भगत, प्रज्वल काकड़, सन्नी शंके, गजानन दुबे, मयूर शिंदे, उमंग जोशी, विवेक देवकते, भाजपा ओबीसी महिला आघाडी अध्यक्ष वैशाली देवकते, प्रमोद तट्टे गणपत शेगोकार, श्याम ठाकूर यांच्यासोबत मोठ्या संख्येने मतदार सहभागी झाले होते.
