अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिका निवडणुकीचा प्रचार चरमशिगेवर पोहचत असून, प्रभागातील मतदारांना प्रत्यक्षात भेटीगाठीवर उमेदवारांनी भर दिला आहे. मनपा निवडणुकीत तीन उमेदवार भाजप आणि एक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा असा असे एकमेव प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक १२ असून या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या युतीच्या उमेदवारांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पदयात्रा व मतदारांशी संपर्क साधण्यावर आहे.माजी महापौर मदन भरगड यांच्या परंपरागत मतदारांची या प्रभागात मोठी संख्या असून, माजी नगरसेवक अजय शर्मा यांच्या समाजातील मतदारांची संख्या देखील निर्णायक आहे. यासोबतच माजी नगर सेविका जान्हवी डोंगरे यांचे पती संतोष डोंगरे रिंगणात उतरले आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गातून अँड. कल्पना संजय गोटफोडे आहेत. भारतीय जनता पक्षाकडून अजय शर्मा, जान्हवी डोंगरे आणि कल्पना गोटफोडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरगड यांच्या पत्नी संगिता भरगड असे एकूण ४ उमेदवार लढत देत आहेत.
निवडणूक प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून महायुतीचा या ४ ही उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन भेट घेण्यावर भर दिला असून, यासोबतच पदयात्रा काढून महायुतीचा जाहीरनामा मतदारांना देवून आपली भूमिका स्पष्ट करीत आहेत. माजी महापौर मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली आणि अचूक व नियोजनबध्द पध्दतीने सुरू असलेल्या प्रचाराने या उमेदवारांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासून मतदान करण्याचाबाबत चारही उमेदवार मतदारांना विस्तारपूर्वक माहिती देताना आपली बाजू मजबूत करीत आहेत. आजपासून मतदानाला ५ दिवसाचा कालावधी बाकी असून, आता कॉर्नर सभा आणि प्रभागात मान असलेल्या प्रतिष्ठीच्या पुढाकाराने समुह बैठक घेऊन उमेदवार आपल्या विजयाचं समिकरण जोडणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भरगड यांचा अशा प्रकारच्या प्रचारात हातखंडा असून या पॅनलची ही जमेची बाजू आहे.आजतरी या प्रभागातील लढत चुरशीची व प्रतिष्ठेची आहे.अशी चर्चा आहे.
