Thursday, February 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोलेकर मतदारांनो तुम्ही 1 मत सुध्दा देऊ शकता. पण.... ! महत्त्वाचा नियम...

अकोलेकर मतदारांनो तुम्ही 1 मत सुध्दा देऊ शकता. पण…. ! महत्त्वाचा नियम समजून घ्या

अकोला दिव्य न्यूज : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई, पुण्यासह एकूण 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे.यात अकोला महापालिकेचा समावेश आहे.मात्र मतदान करण्याचाबाबत शहरात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.मशिनवर एकच बटन दाबले तर किंवा चार मतं वेगवेगळ्या उमेदवाराला दिले तर काय होईल, या मुद्यावर संभ्रमात पडले आहेत. मुळात काहीजण आपल्या राजकीय फायद्यासाठी हे करीत असले तरी मतदान करताना नागरिकांना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे मतदान करताना मत कसं नोंदवायचं आणि EVM वर किती वेळा बटन दाबायचं यासाठीचे काही नियम आहेत, हे मतदानापूर्वी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण योग्य माहिती नसेल, तर तुमची दिशाभूल केली जाईल.

संग्रहित छायाचित्र

तुमचं यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत ही प्रक्रिया आधीपेक्षा वेगळी असल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या आधीच हा संपूर्ण नियम सोप्या शब्दांत समजून घेणं महत्त्वाचं आहे. महानगरपालिका निवडणुकीत मतदान करताना ईव्हीएमवर नक्की किती वेळा बटन दाबायचं हे माहित आहे. पण चारही मत द्यावयाचे नसेल तर? प्रश्न सर्वांना पडलाय.

बहुसदस्यीय निवडणूक म्हणजे काय?

यंदा महानगरपालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेतली जाणार आहे.महानगरपालिकेची निवडणूक ही प्रभाग रचनेनुसार होणार असून एका प्रभागात चार उमेदवारांचं पॅनल असणार आहे. अशावेळी चार उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावं लागणार आहे. यावेळी एका प्रभागात चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. म्हणजेच प्रभागातून ४ वेगवेगळे प्रतिनिधी महानगरपालिकेत जाणार आहेत.

नव्या रचनेनुसार एक प्रभाग म्हणजे चार नगरसेवक. त्यामुळे एका मतदाराला चार उमेदवारांना मतदान करावं लागणार आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला ईव्हीएमवर चार वेळा बटन दाबावं लागेल. ही चारही मतं देणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला चारपैकी एखादं मत द्यायचे नसेल तर तुम्हाला नोटा (NOTA)चे बटन दाबून चार मतं पुर्ण करावे लागेल. जर असं केले नाही, तर तुमचं संपूर्ण मतदान अवैध ठरू शकतं. मतदान करताना तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं जाणार आहे. तुम्ही चार वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मत देऊ शकता. तसेच एखाद्या पक्षाचे चार उमेदवार तुम्हाला योग्य वाटत असतील, तर चारही मत देखील नोटाला (NOTA) देण्याची मुभाही आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची अट किंवा बंधन यामध्ये नाही.

बहुसदस्यीय पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे एका भागाला जास्त प्रतिनिधी मिळतात. त्यामुळे नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी अधिक लोक उपलब्ध राहतात. यामुळे महिलांना, मागास घटकांना आणि विविध सामाजिक गटांना प्रतिनिधित्व मिळण्याची संधी वाढते. शिवाय एका नगरसेवकावर संपूर्ण वॉर्डचा भार राहात नाही.प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्यामुळे एका प्रभागात चार उमेदवारांचं पॅनल असेल. त्यामुळे चारही उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे मतदान करावं लागणार आहे. मतदान केंद्रावर यावेळी किमान दोन आणि कमाल चार ईव्हीएम मशीन असतील. या मशीनवर चार जागांसाठी मतदानाची व्यवस्था केलेली असेल. या जागा अ, ब, क आणि ड अशा नावांनी ओळखल्या जातील. प्रत्येक जागेसाठी वेगळ्या उमेदवारांची यादी असेल.

उमेदवारांच्या संख्येनुसार ईव्हीएमची रचना ठरवली जाईल. काही ठिकाणी चार स्वतंत्र ईव्हीएम असू शकतात, तर काही ठिकाणी दोन मशीनवरच चारही जागांचं विभाजन करण्यात येईल. मतदारांना सोपं जावं यासाठी प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे असतील. अ जागेसाठी पांढरा रंग, ब जागेसाठी गुलाबी रंग, क जागेसाठी पिवळा रंग आणि ड जागेसाठी निळा रंग दिला जाईल. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता कमी राहील.

प्रत्येक ईव्हीएमवर उमेदवाराचं नाव आणि त्याचं निवडणूक चिन्ह स्पष्टपणे दिलेलं असेल. जर तुम्हाला अ जागेसाठी कोणत्याही उमेदवाराला वोट द्यायचे नसेल तर नोटाचे (NOTA) बटन दाबल्यानंतर लाल रंगाचा लाईट लागेल. याचा अर्थ त्या जागेसाठी तुमचं मतदान पूर्ण झालं आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने ब, क आणि ड जागेसाठी मतदान करावं लागेल. जर तुम्हाला चारपैकी कोणत्याही उमेदवाराला किंवा कोणत्याही एक किंवा २ अथवा ३ उमेदवाराला मत द्यायचं नसेल, तर त्या ऐवजी NOTAचं बटन दाबून आपल्या मतं देण्याचं अधिकार पुर्ण केला आहे. शेवटी, ड जागेसाठी या पध्दतीने मतदान केल्यानंतर ईव्हीएममधून एक बजर वाजेल. हा आवाज म्हणजे तुम्ही चारही जागांसाठी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे, याची खात्री असणार आहे. म्हणूनच मतदानाच्या दिवशी गोंधळ न होता शांतपणे आणि पूर्ण माहिती घेऊन मतदान करणं प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!