Thursday, February 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeआज अकोल्याचे दिलीपसिंग गोसल खास.......अकोला महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने. ………

आज अकोल्याचे दिलीपसिंग गोसल खास…….अकोला महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने. ………

अकोला दिव्य न्यूज : येत्या 15 जानेवारीला आपल्या महाराष्ट्र राज्यात महानगर पालिकेच्या निवडणुका होत आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि अनेक स्थानिक सामाजिक व राजकीय नेते कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहे.सर्वाचं अभिनंदन आणि सर्वाना मनःपुर्वक शुभेच्छा !

अकोला जिल्ह्याचा एक गौरवशाली इतिहास आहे. भारतीय घटना समितीचे सभासद ब्रिजलाल बियाणी, महाराष्ट्र राज्याचे पहिले ग्रामीण विकास मंत्री आबासाहेब खेडकर, पहिले राज्यसभा सदस्य विनयकुमार पाराशर, पहिले खासदार असगर हुसेन, आमदार गोविंदराव सरनाईक, सहकार नेते नानासाहेब सपकाळ, पहिले केंद्रीय मंत्री मधुसूदन वैराळे, पहिल्या महिला मंत्री डॉ.प्रमिलाताई टोपले, प्रदिर्घ काळ जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब धाबेकर अशी कितीतरी नावे घेता येईल की ज्यांनी अकोला जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व राज्य पातळीवर नावलौकिक केले.

अकोला शहर पुरता विचार करायचा असेल तर एक वैभवशाली इतिहास आपल्या शहर आणि अकोला नगर परिषदेचा आहे. विविध राजकीय पक्षातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी, सामाजिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यामध्ये आपले योगदान दिले आहे.
या शहराबाबत बोलायचं असेल तर विनयकुमार पाराशर यांचं नाव सर्वात आदराने घेतलं जातंय. याला कोणीही नाकारू शकत नाही. ते माझे आदर्श होते. अकोला शहराला एक सुंदर स्वच्छ स्वरूप यावा यासाठी सर्वात पहिले पुढाकार घेणारे एक मोठे नेतृत्व, अशी त्यांची ओळख आहे.

स्वर्गीय बाबूजी यांची स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूकी बाबत एक मजबूत भूमिका होती की ही निवडणूक पक्षीय राजकारण बाजूला ठेवून फक्त स्थानिकस्तरावर चांगल्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून लढवली गेली पाहिजे. जे फक्त नागरिकांच्या मूलभूत गरजा व सोयीसुविधासाठी नेहमी उपलब्ध असतात आणि शहर विकासाच्या कामात सहभागी होतात. तीच भूमिका घेवून स्वर्गीय बाबूजींनी अकोला शहराची सेवा केली.
माझंपण ठाम मत आहे की या निवडणूकीत नागरिकांनी देखील हाच विचार करून मतदान केले पाहिजे. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जो कार्यकर्ता नेहमी उपलब्ध आहे.दिवस रात्र झटतो. अशाच व्यक्तीला नगरसेवक म्हणून निवडल पाहिजे. या निवडणुकीत राज्य व केंद्र सरकारच्यास्तराचे विषय समोर ठेवून त्याच्या वर निवडणुकीत अनावश्यक चर्चा करून लोकांची दिशाभूल करून मत मागणे चुकीचा आहे असं माझं ठाम मत आहे.
लोकांनी या विषयी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्यासोबतच आपल्या मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांंच्या कडे वेळ आहे. काम करायची इच्छा आहे जिद्द आहे. या बाबतीत शासनाशी लढायची पण ज्याची तयारी आहे. अश्याच लोकांना निवडून दिले पाहिजे खरं तर अकोला शहराच्या विकासासाठी हीच काळाची गरज आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत उपरोक्त निकषांवर खरे ठरणा-या उमेदवारालाच अकोलेकर आपला प्रतिनिधी म्हणून निवडतील आणि आपल्या शहराचा हरवलेले वैभव पुन्हा आणतील हीच आशा बाळगतो.

सामाजिक राजकीय मूल्यांची, वेगवेगळ्या विचारधारांची खूप मोठी अधोगती होऊन निवडणूक महागडी झाली असल्याचे दिसत आहे. असं दुर्दैवी चित्र आज पर्यंत कधी बघितल नाही. कधी ऐकले नाही. जे आज आपण आज बघत आहोत. ते राजकारणाच एक बिभित्स स्वरूप आहे. राजकारणाने खालची पातळी देखील सोडली आहे.
अशा वेळी जागरूक अकोलेकर सर्व गोष्टीचा योग्य विचार करून चांगले प्रतिनिधी महानगर पालिकेत पाठवतील. हीच उमेद आणि परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.

दिलीप सिंग गोसल. माजी नगरसेवक व माजी सभापती
अकोला नगर परिषद अकोला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!