Thursday, February 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeशिंदेंचा एल्गार ! सगळे पक्ष झाले ना मग आता शिवसेनेला संधी...

शिंदेंचा एल्गार ! सगळे पक्ष झाले ना मग आता शिवसेनेला संधी द्या ; निधी कमी पडू देणार नाही

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहराचा सर्वांगीण करून विकसित व सुंदर, स्वच्छ शहर करण्याचे आमचे स्वप्न असून शिवसेनेला संपूर्ण सत्ता द्या. शहराच्या विकासासाठी निधी आणि इच्छाशक्ती कमी पडू देणार नाही असे अभिवचन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोलेकरांना दिले.
अकोला महापालिकेतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज जुने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली आणि कोणीही आले तरी ही योजना बंद करु देणार. याप्रमाणेच शिवसेनेला अकोल्याची सत्ता सोपवा बाकी काळजी मी करेल असा शब्द दिला.

अकोला शहराचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेली सगळी खाती शिवसेनेकडे असून एकदा विश्वास टाकून बघा.शहराचा कायापालट झाला शिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे. मी शब्द पाळणारा शिंदे आहे. असं म्हणाले. अकोला शहरासाठी शिवसेनकडून स्वतंत्रपणे तयार करण्यात आलेल्या वचननाम्याचे लोकार्पण करीत या वचननाम्यात उल्लेख असलेल्या सर्व बाबींची पूर्तता सत्ता आल्यावर पूर्ण करण्याचे वचन दिले.

अकोल्यात तुम्ही आजपर्यंत सगळ्या पक्षांना संधी दिली आहे आता फक्त यावेळी शिवसेनेला सेवेची संधी देऊन बघा. शहराच्या योजनाबद्ध विकास करण्यावर आमचा भर राहील,गेली अनेक वर्ष आपण नगरविकास खाते सांभाळत असताना या शहराच्या विविध योजनांसाठी निधी देण्याचे काम केलं आहे ,अकोल्याच्या सगळ्या प्राथमिक समस्या आणि गरज याची आपलयाला जाणीव आहे ,त्यासाठी काम करणारी मोठी टीम आमच्याकडे आहे ,आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत ,त्यामुळे हा तुमचा भाऊ जे बोलतो ते कजिवाची बाजी लावून करून दाखवतो याची खात्री बाळगा असेही आवाहन त्यांनी केले.

आजवर ज्यानी सत्ता भोगली त्यांनी साधे पिण्याचे पाणी सुद्धा नियमित दिले नाही. मग ते तुमचा विकास काय करणार असा टोला लगावत यावेळी परिवर्तन घडविण्यासाठी महापालिकेवर सेनेचा भगवा फडकवा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केले.सभेला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव,ना.संजय राठोड,निरीक्षक श्रीकांत देशपांडे,शशिकांत खेडेकर, उपनेते गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर अश्विन नवले,नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे गुरुजी, विठ्ठल सरप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष उषाताई विरक,रेखाताई राऊत शहरप्रमुख राजेश मिश्रा,वैभव चौधरी,रमेश गायकवाड,तरुण बगेरेसह पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!