Sunday, March 22, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा उद्या

अकोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा उद्या

अकोला दिव्य न्यूज : राज्यातील महापालिका निवडणुक संग्रमाला आता वेग आला असून, अकोला महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवत आहे. भाजप व शिवसेना पक्षाच्या स्थानिक नेत्यांना ही लढत प्रतिष्ठेची असून उद्या बुधवार ७ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या बुधवार ७ जानेवारी रोजी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

नवीन अकोला शहरापेक्षा जुने अकोला शहरात शिवसेनेची पकड मजबूत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभा ठेवण्यात आली आहे. सभेची वेळ दुपारी २ वाजताची असून ही सभा भव्य दिव्य करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या सभेसाठी माजी आमदार विप्लव बाजोरिया यांना प्रमुख जबाबदारी दिली गेली आहे.

अकोला शहर व जिल्ह्यात भाजप कांकणभर सरस असली तरी शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रूजली आहे.आजवर झालेल्या निवडणुकीत युतीच्या माध्यमातून निवडणुक लढविली गेली मात्र यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेनी वेगळी चूल मांडली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते व मुख्यमंत्री फडणवीस यांची अकोला क्रिकेट क्लब मैदानावर प्रचार सभा पार पडली. आता शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या बुधवार ७ जानेवारी रोजी जाहीर सभा होत आहे. सभेत शिवसेना पक्षप्रमुख शिंदे काय घोषणा करतात, याकडे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!