Sunday, March 22, 2026
No menu items!
No menu items!
Homeअनिल गर्ग यांनी आयुष्य संपवलं ! “आयुष्याचा कंटाळा…...”

अनिल गर्ग यांनी आयुष्य संपवलं ! “आयुष्याचा कंटाळा……”

अकोला दिव्य न्यूज : आपल्याला सुखासीन आयुष्य जगायचं असेल तर काय अपेक्षा असतात? चांगली नोकरी, चांगलं घर, चांगलं कुटुंब. पण हे सगळं असूनही कुणी आत्महत्या केली तर? होय अशीच एक घटना समोर आली आहे. दिल्लीतल्या नोएडा भागात राहणाऱ्या अनिल गर्ग यांनी आयुष्य संपवलं आहे. मी आयुष्याला कंटाळलो आहे त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकी काय घटना घडली?
नोएडा येथील ATS वन हॅमलेट या एकदम उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या अनिल गर्ग यांनी आयुष्य संपवलं आहे. त्यांची सुसाईड नोट मिळाली आहे. त्यांनी यात लिहिलं आहे की मी आयुष्याला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलतोय. माझं माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे असंही त्यांनी लिहिलं आहे. अनिल गर्ग एक उच्चभ्रू आयुष्य जगत होते, चांगल्या आलिशान सोसायटीत वास्तव्य करत होते. तरीही त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं? ते आयुष्याला का कंटाळले? याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. अनिल गर्ग यांनी त्यांच्या सोसायटीच्या १७ व्या मजल्यावरुन उडी मारली आणि आयुष्य संपवलं. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक गर्ग यांनी आयुष्य संपवलं
अनिल गर्ग यांना कर्ज झालं होतं का तर मुळीच नाही कारण ते चांगल्या पगाराची नोकरी करत होते. अनिल गर्ग भारतातील इंडियन ऑईल कंपनीचे कार्यकारी संचालकही होते. तरीही त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात अनिल गर्ग यांनी लिहिलं आहे की ते आयुष्याला कंटाळले आहेत. या प्रकरणात आता पोलीस पुढील तपास करत आहे. पोलीस या प्रकरणाचे सगळे पैलू लक्षात घेऊन तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कुटुंबातील सदस्यांचे जबाबही नोंदवले आहेत. या घटनेनंतर या सोसायटीवर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!