अकोला दिव्य न्यूज : अकोल्यात स्वतःचं घर आता स्वप्न नाही, वास्तव असून VITEX 2026 मध्ये कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनीने उभारलेल्या आकर्षक, माहितीपूर्ण व अनुभव समृद्ध स्टॉल क्रमांक A-18/19 येथे आजपासून येत्या ५ जानेवारी २०२६ पर्यंत आपल्या कुटुंबासह भेट घेऊन प्रकल्पांची तुलना करा, प्रश्न विचारा आणि अकोल्यात स्वतःच्या घराचं स्वप्न वास्तवात उतरवण्याची पहिली पायरी इथूनच चढा !

विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडून गौरक्षण संस्थान ग्राउंड, गोरक्षण रोड, अकोला येथे आयोजित केलेल्या VITEX 2026 मध्ये उद्योग, व्यापार आणि गृहनिर्माण क्षेत्रातील नामवंत ब्रँड्स एकाच छताखाली आहेत. येथे कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या स्टॉल क्रमांक A-18/19 वर आकर्षक, माहितीपूर्ण व अनुभवसमृद्ध पॅव्हिलियन उभारला आहे.
बांधकाम क्षेत्रात कोठारी कन्स्ट्रक्शनची विश्वासाची परंपरा कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी (KCC) ही अकोल्यातील एका विश्वासार्ह आणि दर्जेदार बांधकामासाठी ओळखली जाणारी रिअल इस्टेट कंपनी असून, अनेक वर्षांपासून परवडणाऱ्या व सुविधा-संपन्न प्रकल्पांवर काम करत आहे. कंपनीच्या विविध प्रकल्पांमध्ये १, २ आणि ३ BHफ्लॅट्स, आधुनिक डुप्लेक्स व रो हाऊसेस अशा पर्यायांची उपलब्धता असून सर्व प्रकल्प RERA नोंदणीकृत आहेत. घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर मुलांच्या शिक्षणापासून आरोग्य आणि भविष्याच्या गुंतवणुकीपर्यंतचा सुरक्षित आधार ही कंपनीची दृष्टि प्रत्येक प्रकल्पातून जाणवते.

केंद्र शासनाच्या ‘Housing for AII’ संकल्पनेशी सुसंगत राहून, KCC कडील 1BHK फ्लॅट्सवर पात्र ग्राहकांना अनुदानाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात स्वतःचं घर मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. मध्यमवर्गीय कुटुंबे, नोकरीला लागलेले तरुण आणि नवदांपत्यांसाठी EMI सुलभहोईल अशा पद्धतीने प्रकल्पांची रचना करण्यात आली आहे. बँक फायनान्स, सरकारी सबसिडी, कागदपत्रे आणि खरेदी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी स्टॉलवर स्वतंत्र सल्ला काउंटर ठेवण्यात येणार आहे.
आधुनिक जीवनशैली व सुविधा : KCC च्या प्रकल्पांमध्ये नियोजनबद्ध टाउनशिप, प्रशस्त अंतर्गत रस्ते, पुरेशी पार्किंग, मुलांचा खेळाचा परिसर, CCTV व सुरक्षा व्यवस्था यांसारख्या सुविधा उपलब्ध करून आधुनिक जीवनशैलीचा खरा अनुभव देण्यावर भर आहे. १, २ व ३ BHK फ्लॅट्ससोबत अत्याधुनिक डुप्लेक्स व रो-हाऊसेस अशा कुटुंबांसाठी डिझाइन केले गेले आहेत जे प्रायव्हसी, ओपन स्पेस आणि स्वतंत्र घराचा अनुभव शोधत आहेत.

काही प्रकल्पांमध्ये कम्युनिटी हॉल, जॉगिंग ट्रॅक, गार्डन इत्यादी सोयींमुळे घर केवळ Living Space न राहता खऱ्या अर्थाने Lifestyle Space ठरत आहे. घर खरेदीची योजना मनात असो किंवा फक्त भविष्यासाठी माहिती गोळा करण्याचा विचार २ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान VITEX 2026 मधील STALL NO. A-18/19 ला अवश्य भेट द्या. स्टॉलवर प्रकल्पांचे 3D लेआउट, लोकेशन मॅप्स, नमुना फ्लॅट्सचे व्हिडिओ, प्राइस रेंज, सबसिडी व फायनान्स पर्यायांची माहिती तज्ञ टीममार्फत दिली जाणार आहे.
