अकोला दिव्य न्यूज : विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव स्पर्धेत अकोला येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या बालकांनी सादर केलेल्या ‘वीर तानाजी… स्वराज्य सिंह’ या संस्कृत भाषेतील नाटकाने प्रथम क्रमांक पटकावून विश्वास करंडक काबीज केला आहे. अकोला येथीलच प्रभात किड्सने सादर केलेल्या ‘आहुती’ नाटकाने द्वितीय तर अमरावती येथील स्कूल ऑफ एक्सलंटच्या ‘स्वयंपूर्ण’ नाटकाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या नाटकांना अनुक्रमेरोख 15000, 11000 व 7000 रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात आलीत.
बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महोत्सवाचे प्रमुख प्रा. मधु जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे परीक्षक तथा भारतीय फिल्म विभागाचे संकलक विनय वैराळे व अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुरज गोळे उपस्थित होते. यांचे सोबतच व्यासपीठावर महोत्सवाचे निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, सहप्रमुख प्रदीप अवचार, परीक्षक धनंजय सरदेशपांडे व यतीन माझीरे उपस्थित होते.

सोहळ्याचा प्रारंभी प्रशांत गावंडे यांनी प्रास्ताविक करून स्पर्धा आयोजनाचा हेतू सांगितला. प्रा. मधु जाधव, विनय वैराळे,सुरज गोळे, परीक्षक धनंजय सरदेशपांडे व यतीन माझीरे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करून बाल नाट्य कलावंतांना या क्षेत्रातील महत्त्वाचे मार्गदर्शन केले. यावर्षीच्या नाट्य स्पर्धेत अमरावती, अकोला, बुलढाणा, व वाशिम जिल्ह्यातील 27 शाळांमधील 27 बालनाट्य सादर करण्यात आलीत. या नाटकांचे परीक्षक म्हणून नाट्य क्षेत्रातील तज्ञ धनंजय सरदेशपांडे व यतीन माझीरे यांनी काम बघितले.
बक्षीस वितरणाच्या प्रारंभी विश्वास करंडकाची खुले नाट्यगृह ते नवीन बस स्थानक या मार्गाने सुमारे पाचशे विद्यार्थ्यांच्या सहभागात मिरवणूक काढण्यात आली.उत्कृष्ट अभिनयासाठी मुलींमधून तानाजी नाटकात तानाजी ची भूमिका करणाऱ्या किंजल पालखेडे हिला प्रथम, देशभक्ती नाटकात दुर्गा भाभी ची भूमिका करणाऱ्या स्वरा मानेकर हिला द्वितीय तर आनंदाचे झाड नाटकात आईची भूमिका करणाऱ्या संस्कृती आढाव हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

उत्कृष्ट अभिनयासाठी मुलांमधून वत्सल देहाणकर यास प्रथम, लेक वाचवा नाटकात सखाराम पाटील ची भूमिका करणाऱ्या बालकास द्वितीय तर अन्वेष भुजाडे या बालकास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
उत्कृष्ट वेशभूषाकरिता आणि सदाफुली रंगीत झाली या नाटकातील पुनम पाचबोले व प्रज्ञा बेलखेडे यांना प्रथम, ऑपरेशन सिंदूर करिता द्वितीय तर देशभक्ती नाटकाकरिता योगिता घोडके व श्वेता कुलकर्णी यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. उत्कृष्ट प्रकाश योजने करिता शुभम ठाकरे यांना प्रथम, प्रमोद गोलडे यांना द्वितीय तर महेश इंगळे यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट संगीताकरिता प्रणव कोरे यांना प्रथम, पंकज खराबे यांना द्वितीय तर आनंदाचे झाड करिता तृतीय क्रमांक देण्यात आला.
उत्कृष्ट दिग्दर्शनाकरिता वीर तानाजी नाटकाच्या स्वप्ना तायडे यांना प्रथम,स्वयंपूर्ण नाटकाकरिता शुभम ठाकरे यांना द्वितीय तर आहुती नाटकाकरिता चंद्रकांत पोरे यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.
उत्कृष्ट सादरीकरण करिता लाली नाटकासाठी एजुविला पब्लिक स्कूल पातुर यांना प्रथम तर पपेट नाटकाकरिता राजेश्वर कॉन्व्हेंट अकोला यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला. ही दोन्ही पारितोषिके उत्तेजनार्थ होती. नवीन संहिते करिता उत्कृष्ट लेखक पुरस्कार बोन्साय नाटकाच्या रेवती पांडे व पपेट नाटकाकरिता कांचन पटोकार यांना विभागून देण्यात आला. उत्कृष्ट नेपथ्याकरिताप्रथम पारितोषिक लाली नाटकास, द्वितीय पारितोषिक वीर तानाजी नाटकास व तृतीय पारितोषिक आहुती नाटकास देण्यात आले.
याशिवाय प्रत्येक नाटकातील उत्कृष्ट कलावंतांसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक त्रिशा राठोड, ओवी चिने, पार्थ तळोकार, तनिषा, गार्गी गीते, अमोघ वाघमारे, शिवानी खेळकर, जय नागे, दिशा पंडित, सृष्टी कटारे, चैताली लठाळ, स्वराज डिगोळे, स्मित भोयर, सम्यक ठोके, स्पृहा फुलाने, विराज वानखेडे, उर्वशी गुजर, श्रावणी घाटोळे, श्रुती खंडारे, प्रसाद उगले, आराध्या चिंचोळकर, स्वरा इढोळे, कृष्णाई अकर्ते यांना देण्यात आलीत.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ओजस्विनी देशमुख यांनी केले. कार्यक्रमास नाट्य क्षेत्रातील अरुण घाटोळे, अशोक ढेरे, विष्णू निंबाळकर, रमेश थोरात डॉ. सुनील गजरे, अनिल कुलकर्णी, दीपक माई, सचिन गिरी वशी कडूनवशी कडून नाट्य रसिक व शेकडो नाट्य रसिक उपस्थित होते.
या संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वी ते करिता प्रा. मधु जाधव, प्रशांत गावंडे, प्रदीप खाडे, प्रदीप अवचार यांचे सह जे आर डी टाटा स्कूलच्या प्राचार्या प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, रितेश महल्ले, संदीप शेवलकर, अंकुश इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
