अकोला दिव्य न्यूज : Maharashtra Muncipal Corporations Election 2026 Dates: राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगर पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ जानेवारीला सर्व महापालिकांसांठी मतदान पार पडणार आहे, तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
-नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी – २३ ते ३० डिसेंबर
-नामनिर्देशन पत्र छाननी – ३१ डिसेंबर २०२५
-उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – २ जानेवारी २०२६
-निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६
-मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडेल.
-निवडणूक निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी लागेल.
राज्य निवडणूक आयुक्तांनी काय म्हटलं?
“आजच्या पत्रकार परिषदेत मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यासाठी करण्यात आलेली कार्यवाही याबाबतची माहिती देण्यासाठी घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या संदर्भात ही पत्रकार परिषद असून २९ पैकी २७ महापालिकेची मुदत संपलेली आहे. तर ५ महापालिकेची मुदत २०२० मध्येच संपलेली होती. तसेच १८ महापालिकांची मुंबईसह २०२२ मध्ये मुदत संपलेली होती. तसेच ४ महापालिकांची मुदत ही २०२३ मध्ये संपलेली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
दुबार मतदारांना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या?
दुबार मतदारांना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत याबाबत बोलताना राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की, “या निवडणुकीसाठी संभाव्य दुबार मतदाराची ओळख केलेली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असं मार्क करण्यात आलं आहे. या मतदारांच्या संदर्भात महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलं आहे. तसेच दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल हे लिहून घेण्यात आलं आहे. त्या मतदान केंद्राव्यतिरिक्त त्याला इतर कुठेही मतदान करू दिलं जाणार नाही”, असं राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
३१ जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे न्यायालयाने दिले होते आदेश
गेल्या काही महिन्यांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोप, न्यायलयीन लढा आणि सरतेशेवटी ३१ जानेवारीच्या अंतिम मुदतीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे चर्चेत असलेल्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका आज अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. १५ जानेवारीला राज्यातील मुंबई, ठाण्यासह एकूण २९ महानगरपालिकांसाठी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर केले जाणार
