अकोला दिव्य न्यूज : जलतरण स्पर्धेतील ५० मीटर बॅकस्ट्रोक जलतरण क्रीडा प्रकारात दुसरे स्थान पटकवित रौप्य पदक आणि २०० मीटर जलतरण स्पर्धेत मध्ये प्रथम क्रमांक मिळवित अनुज आशिष पनपालिया याने एक नवीन उच्चांक गाठला आहे. माउंट कार्मेल स्कूलचा विद्यार्थी असलेल्या अनुज पनपालिया याने अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि लोकमत समुह यांच्या संयुक्त विद्यमाने ४ डिसेंबर ते ६ डिसेंबर २५ या कालावधीत आयोजित केलेल्या जलतरण क्रीडा स्पर्धेत माऊंट कार्मेल स्कुलचे प्रतिनिधित्व करीत शाळेला घवघवीत यश प्राप्त करून दिले.

अकोला येथील वसंत देसाई क्रिडांगण येथे आयोजित औपचारिक सत्कार सोहळ्यात अनुजला पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
अकोला शहरातील नेत्रदान चळवळीचे प्रणेते व जुन्या काळातील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. चंद्रकांत पनपालिया यांचा अनुज हा नातू आहे. तर माहेश्वरी समाज ट्रस्टचे माजी कोषाध्यक्ष व कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी डॉ. आशिष पनपालिया व डॉ.सपना पनपालिया यांचा अनुज हा मुलगा आहे. त्यांने प्राप्त केलेल्या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

