Wednesday, November 26, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील उद्योजक डॉ. मनोज अग्रवाल यांचा जिवन गौरव पुरस्काराने सन्मान

अकोल्यातील उद्योजक डॉ. मनोज अग्रवाल यांचा जिवन गौरव पुरस्काराने सन्मान

अकोला दिव्य न्यूज : सामाजिक ऋण उतराईच्या भावनेतून समाजातील तळागाळातील लोकांना शैक्षणिक व वैद्यकीय गरजांचा वेळी मदतीचा हात पुढे करून साथ देणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिध्द उद्योजक व बांधकाम व्यावसायिक डॉ. मनोज अग्रवाल यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात आयोजित एका शानदार सोहळ्यात केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. देशभरात विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्या-या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत त्या मधुन डॉ. मनोज अग्रवाल यांची निवड करण्यात आली. अकोल्याकरीता ही निश्चितच गौरवांची बाब आहे.

लायन्स ऑफ अकोला मीडटाऊनचे अध्यक्ष डॉ. अग्रवाल यांचे सामाजिक कार्यात नेहमीच योगदान राहते. या अगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ.अग्रवाल यांना महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार 2022, बिझनेस एक्सलंस अवार्ड 2024 केंद्रीय मंत्री देण्यात आले होते. तसेच केंद्रीय सामाजिक कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारत भुषण नॅशनल एक्सलन्स पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले होते. या पुरस्काराबद्दल अकोल्यातील सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!