अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन वर्षांपासून खोळंबलेल्या निवडणूकीचा बिगूल वाजला असून बुलढाणा जिल्ह्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर अकोला शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड यांची बुलढाणा जिल्ह्याच्या ‘समन्वयक’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने आणि प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जिल्हा समन्वयकाची जिल्हावार नियुक्ती करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या ‘समन्वयक’ पदी मदन भरगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अकोला महानगर पालिकेच्या निवडणुकीचा दांडगा अनुभव असलेले भरगड यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक व नियोजनाला नवी दिशा व बळकटी प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
