अकोला दिव्य न्यूज : अकोल्यातील एका गरजवंत महिलेला होत असलेल्या असह्यवेदना आणि बेताच्या परिस्थितीमुळे टाळले जात असलेले ऑपरेशन पाहून लायन्स क्लब मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. मनोज अग्रवाल यांनी रूग्णालयातील शस्त्रक्रीयेसाठी तातडीने रक्कम दिली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. अकोल्यातील गरजवंत माधुरी तांबे या रुग्ण महिलेला किडनी स्टोनचा त्रास होतं होता.

त्यांना ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या करीता दवाखान्याचा उपचारासाठी रक्कम नव्हती. ही बाब लायन्स क्लब मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. मनोज अग्रवाल यांना कळली. त्यांनी लगेच यासाठी रक्कम पाठवून ऑपरेशन करण्यास मदत केली. याकार्यासाठी लायन्स क्लब मिडटाउनचे पदाधिकारी सुभाष चांडक, प्रशांत फुलारी, संजय राऊत, बाळासाहेब काळे यांनी सहकार्य केले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
