अकोला दिव्य न्यूज : विदर्भातील विशेषतः पश्चिम विदर्भातील व्यापारी, उद्योजक आणि सेवा क्षेत्रातील व्यावसायीकांना त्यांची उत्पादने, सेवा आणि ब्रँड ओळख सर्वसामान्यांसमोर प्रदर्शित करण्यासाठी येत्या जानेवारी महिन्यात VITEX-2026 अर्थात विदर्भ इंडस्ट्री अँड ट्रेड एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडून 2, 3, 4 आणि 5 जानेवारी 2026 रोजी अकोला येथील गोरक्षण रोड वरील गोरक्षण संस्थान मैदानावर आयोजित करण्यात येत आहे.

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा बी २ बी आणि बी २ सी व्यवसाय महोत्सव राहणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह राज्यातून २ लाखांहून अधिक अभ्यागत यामध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. चेंबरने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एकूण १८७ जणांनी भाग घेतला असून स्टॉल्स वाटपाचे काम सुरू झाले आहे.स्टॉल्सचे वाटप प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जात आहे. आतापर्यंत ७० हून अधिक स्टॉल बुक झाले आहेत
सर्व व्यावसायिकांनी आजच आपला स्टॉल बुक करावा आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग व्हावे.तसेच, ज्या व्यावसायिक बांधवांकडे कोणत्याही कंपनीची एजन्सी किंवा डीलरशिप आहे त्यांनी त्यांच्या कंपनीला प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. जेणेकरून उत्पादनांची जाहिरात वाढेल, ग्राहकांपर्यंत थेट पोहोच निर्माण होईल आणि भविष्यात जास्तीत जास्त व्यावसायिक फायदे मिळू शकतील.
जर तुमच्याकडे एखाद अनोखे उत्पादन किंवा सेवा असेल, तर हे प्लॅटफॉर्म ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याची सुवर्णसंधी देते. तुमचा व्यवसाय एका नवीन उंचीवर नेण्यासाठी व तुमच्यासोबत इतरांना वाढण्यास मदत करण्यासाठी या कार्यक्रमात सामील व्हा. असं आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्टॉल बुकिंगसाठी निकेश गुप्ता – ९८२३० ६९४२१, सिद्धार्थ रुहटिया – ९८२३२ ५७७१२, निखिल अग्रवाल – ९९२२३ ६२८८८, निरव वोरा – 98600 43000, किशोर बच्छुका – ९४२३६ ००१११, किरीट मंत्री ९४२२१ ७५६५४ आणि राहुल मित्तल ९४२२१ ६३८३६ यांच्यासोबत संपर्क साधावा
